जसे की आपल्या सर्वांनाच माहितच आहे की, आजपासून T20 वर्ल्ड कर सुरु होणार आहे आणि त्याच दृष्टीकोनातून रिलायन्स जिओने 6 क्रिकेट स्टेडियम्समध्ये फ्री अनलिमिटेड वायफाय देण्याचा निर्णय घेतला आहे.
आजपासून T20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे आणि त्याच दृष्टीकोनातून रिलायन्स जिओने 6 क्रिकेट स्टेडियम्समध्ये फ्री अनलिमिटेड वायफाय देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या फिरोज शहा कोटना स्टेडियममध्ये ह्या सेवेला लाँच करण्यात आले असून, त्यांच्या वक्त्यांनी सांगितले की, “रिलायन्स जिओने 6 स्टेडियम्समध्ये वायफाय नेटवर्कचे सेटअप केले आहे. हा दर्शकांसाठी मोफत होणार आहे. त्याचबरोबर दर्शकांना ह्याचे अनलिमिटेड एक्सेससुद्धा मिळणार आहे.”
Survey
✅ Thank you for completing the survey!
कंपनी ह्या वायफायचे फ्री अनलिमिटेड एक्सेस कोलकताच्या ईडन गार्डन, मुंबईचे वानखेडे, मोहालीचे IS ब्रिंदा स्टेडियम, धर्मशाळाचे HPCA स्टेडियम, बंगळूरुचे चिन्नास्वामी स्टेडियम आणि दिल्लीचे फिरोजशाह स्टेडियममध्ये मिळेल. रिलायन्स कडून असेही सांगण्यात आले आहे की, “आम्ही मुंबईमध्ये जवळपास ३०,००० लोकांना ह्या सेवेशी जोडण्याचा विचार करत आहोत, मात्र २०,००० लोक हे काहीही करुन ह्या सेवेशी जोडलेले राहतील. त्यांना १५-३५ मेगाबाइटवर सेकंदच्या स्पीडने ही सेवा मिळणार आहे.”
फिरोजशाह कोटलामध्ये रिलायन्स जिओने ह्या सेवेला योग्यरित्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जवळपास ६५० एक्सेस पॉइंट बनवले आहेत, ज्याने जवळपास ४०,००० लोकांना ही सेवा मिळेल. त्याचबरोबर इडन गार्डनमध्ये ६८,०००, ४१,००० फिरोजशाह कोटला, ३३,००० वानखेडे, २६,००० मोहाली, ३५,००० चिन्नास्वामी आणि २३,००० कनेक्शन धर्मशाला स्टेडियममध्ये सपोर्ट करेल.