आता फ्रीडम 251 स्मार्टफोनवर उपलब्ध होणार ‘कॅश ऑन डिलिवरी’ सुविधा

HIGHLIGHTS

251 रुपयात स्मार्टफोन देणारी कंपनी रिंगिंग बेल्सने आपल्या ग्राहकांना पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे.

आता फ्रीडम 251 स्मार्टफोनवर उपलब्ध होणार ‘कॅश ऑन डिलिवरी’ सुविधा

मोबाइल निर्माता रिंगिंग बेल्सने भारतीय बाजारात आणलेला नवीन स्मार्टफोन फ्रीडम 251 हा ३० जूनपर्यंत घराघरात पोहोचणार आहे. पण ह्याची रजिस्ट्रेशन करणा-यांची संख्या लक्षात घेता रिंगिंग बेल्सने अशी घोषणा केली आहे की, ज्यांनी ह्या फोनसाठी प्री-बुकिंग केले आहे त्यातील पहिल्या २५ लाख ग्राहकांसाठीच “cash on delivery” ही सेवा उपलब्ध केली आहे. ह्याआधी ह्या फोनला बुक केल्यावर आपल्याला फोन डिलिवरी होण्याआधी त्याची पुर्ण रक्कम द्यावी लागत होती.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

कंपनीने आपल्या दाव्यांच्या नकारात्मक आकलन पाहता रिंगिंग बेल्सने आपल्या ग्राहकांना पैसे परत देण्यास सुरुवात केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रिंगिंग बेल्सचे निर्देशक मोहित गोयल यांनी सांगितले की, “आम्हाला घेऊन लोकांच्या मनात खूप नकारात्मकता होती, त्यासाठी आम्ही आता फोन डिलिवरी केल्यानंतरच ग्राहकांकडून पैसे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी फोन बुक करण्यासाठी पैसे दिले आहे, त्यांना आम्ही हे पैसे परत करत आहोत आणि आम्ही सर्वांसाठी “कॅश ऑन डिलिवरी” विकल्प देत आहोत.

आतापर्यंत जवळपास ३० हजार लोकांनी फ्रीडम 251 च्या बुकिंगचे पैसे दिले होते आणि ७ करोडपेक्षा जास्त लोकांनी ह्याचे रजिस्ट्रेशन केले आहे. ह्या पैशाचे पेमेंट सीसीएवेन्यू आणि पेयूबिजच्या माध्यमातून झाले आहे.

हेदेखील वाचा –  १,००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट IEM हेडफोन्स (जानेवारी २०१६)

हेदेखील वाचा – २२ मार्चला लाँच होणार अॅप्पल आयफोन 5Se ?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo