फ्रीडम 251: ह्या स्मार्टफोनसाठी रिंगिग बेल्स स्विकारणार कॅश ऑन डिलिवरी

HIGHLIGHTS

रिंगिंग बेल्स कंपनीने अशी घोषणा केली आहे की, ही सुविधा फक्त पहिल्या २५ लाख ग्राहकांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी ह्या मोबाईलसाठी रजिस्ट्रेशन केले आहे.

फ्रीडम 251: ह्या स्मार्टफोनसाठी रिंगिग बेल्स स्विकारणार कॅश ऑन डिलिवरी

मोबाइल निर्माता रिंगिंग बेल्सने भारतीय बाजारात आणलेला नवीन स्मार्टफोन फ्रीडम 251 हा ३० जूनपर्यंत घराघरात पोहोचणार आहे. पण ह्याची रजिस्ट्रेशन करणा-यांची संख्या लक्षात घेता रिंगिंग बेल्सने अशी घोषणा केली आहे की, ज्यांनी ह्या फोनसाठी प्री-बुकिंग केले आहे त्यातील पहिल्या २५ लाख ग्राहकांसाठीच “cash on delivery” ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या पेमेंटसंदर्भात ग्राहकांना ईमेल्स पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

कंपनीच्या फेसबुक पेजवर असे सांगण्यात आले आहे की, “आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही रिंगिंग बेल्सने ‘Payment Gateway’ च्या माध्यमातून “Cash on Delivery” सेवा देणार आहोत”, त्यानुसार आमच्या पहिल्या 25 लाख ग्राहकांना जेव्हा हा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचेल तेव्हाच त्यांना पेमेंट द्यावे लागेल. त्यासाठी आमची ईमेल्स प्रक्रिया चालू आहे. तुम्ही आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे शतश: ऋणी आहोत.

 

एवढ्या कमी किंमतीत स्मार्टफोन्स आणल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून रिंगिंग बेल्स कंपनी आणि त्यांचा हा फ्रीडम 251 स्मार्टफोनची सध्या जोरदार चर्चा आहे. तसेच त्यांच्या ह्या स्मार्टफोन्सबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तो वादाच्या भोव-यातही अडकला आहे. PayUBiz ने तर असेही सांगितले आहे की, रिंगिंग बेल्स ग्राहकांची दिशाभूल करु पाहात आहे आणि ग्राहकांचे पैसे डिलिवरीपर्यंत अडकू पाहात आहे.

स्मार्टफोनमध्ये ते सर्व मिळत आहे, जे आपल्याला ५०००  पासून ७००० पर्यंत येणा-या स्मार्टफोनमध्ये मिळते. ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची QHD IPS डिस्प्लेसह 1.3GHz चे क्वाड-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्याचबरोबर ह्यात फोटोग्राफीसाठी 3.2 MP चा रियर आणि 0.3MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन 5.1 लॉलीपॉपवर काम करतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB चे रॅम, 8GB चे अंतर्गत स्टोरेज ज्याला 32GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय ह्यात 1450mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर केवळ २५१ रुपयात आपल्याला 3G सपोर्ट करणारा एक ड्यूल सिम स्मार्टफोन मिळत आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo