हा ड्यूल फ्रंट कॅमे-यासह येणारा सर्वात खास असा स्मार्टफोन आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्याच वैशिष्ट्यामुळे यूजर्सला एक वेगळा अनुभव मिळेल. त्यामुळे फोटोग्राफी तसेच विशेषकरुन सेल्फीला एक नवीन रुप मिळेल.
मोबाईल निर्माता कंपनी लिनोवो ह्या महिन्यात आपला नवीन स्मार्टफोन वाइब S1 लाँच करेल. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केला आहे. ह्या महिन्याअखेरीस हा लाँच केला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, लिनोवो वाइब S1 भारतीय बाजारात 22 हजारात लाँच केला जाईल. लिनोवोने ह्याच वर्षी सप्टेंबरमध्ये आयोजित IFA 2015 दरम्योन वाइब S1 मॉडल प्रदर्शित केला होता.
ह्या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा ड्यूल फ्रंट कॅमे-यासह येणारा खास स्मार्टफोन आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ह्याच वैशिष्ट्यामुळे यूजर्सला एक वेगळा अनुभव मिळेल. त्यामुळे फोटोग्राफी तसेच विशेषकरुन सेल्फीला एक नवीन रुप मिळेल.
स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि त्याचबरोबर २ मेगापिक्सेलचा आणखी एक सेकेंडरी कॅमेरा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून आपण एक चांगला सेल्फी घेऊ शकता. त्याचबरोबर आपले फोटो अजून चांगले येण्यासाठी स्मार्टफोनमध्ये फोटो एडिटिंग टूलसुद्धा दिला गेला आहे. उदाहरणार्थ जर आपण आपल्या सेल्फीवर ब्लर करु इच्छिता, तर हा आपल्या फोटोवर कुठेही री-फोकसिंग करु शकतो.
जर ह्या स्मार्टफोनच्या इतर लीक्सवर लक्ष केंद्रीत केले असता, ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची FHD डिस्प्ले, 64-बिट मिडियाटेक ऑक्टा-कोर 1.7GHz प्रोसेसरसह 3GB ची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. ह्या स्मार्टफोनचे वजन १३० ग्रॅम आहे आणि 143 x 70.8 x 7.85mm परिमाणासह लाँच होईल. त्याचबरोबर हा काळा, पांढरा, निळा, जांभळा आणि गुलाबी रंगात मिळेल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर चालतो, त्याशिवाय ह्यात LTE कनेक्टिव्हिटीसुद्धा आहे.