भारतात लाँच झाला वनप्लस X स्मार्टफोन

HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्यूल सिमसुद्धा आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकता.

भारतात लाँच झाला वनप्लस X स्मार्टफोन

मोबाईल निर्माता कंपनी वनप्लसने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन वनप्लसX लाँच केला आहे. ह्याची किंमत १६,९९९ रुपयापासून सुरु होईल. कंपनीने हा दोन व्हर्जनमध्ये सादर केला आहे. ह्याच्या दुस-या व्हर्जनची किंमत २२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर उपलब्ध होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

जर वनप्लस Xच्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलायचे झाले तर, ग्लास व्हर्जन वनप्लस x ओनिक्स ब्लॅकग्लाससह लाँच झाला आहे. ह्याची किंमत १६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ह्याचे वजन १३८ ग्रॅम आहे. तर त्याच्या दुस-या व्हर्जन वनप्लस X सेरामिकविषयी बोलायचे झाले तर, ह्यात जिर्कोनियाचा वापर केला गेला आहे आणि ह्याची किंमत २२,९९९ रुपये आहे. ह्याचे वजन १६० ग्रॅम आहे.

ह्याच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात एक हायब्रिड ड्युल सिमसुद्धा आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ओएस २.१ वर चालेल. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा स्मार्टफोन 2.3GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 चिपसेटने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकतो.

त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ADAFसह  १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE सपोर्ट दिला आहे. वनप्लस X स्मार्टफोन ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन २५२५mAh बॅटरी सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE बँड, वायफाय 802.11 B/G/N, एफएम रेडियो आणि मायक्रो-USB वैशिष्ट्य समाविष्ट आहे.

कंपनीने ह्याआधी आपला २०१६ फ्लॅगशिप किलर वनप्लस२ लाँच केला होता.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo