विकेडलीक वॅमी टायटन ५ स्मार्टफोन लाँच, किंमत १४,९९० रुपये

HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन १.३ ऑक्टा-कोर मीडियाटेक MT6753M चिपसेट, ३जीबी रॅम आणि ARM माली-T720 GPUने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीची अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे.

विकेडलीक वॅमी टायटन ५ स्मार्टफोन लाँच, किंमत १४,९९० रुपये

मोबाईल निर्माता कंपनी विकेडलीकने आपला नवीन स्मार्टफोन वॅमी टायटन ५ लाँच केला. ह्या स्मार्टफोनची किंमत १४,९९० रुपये ठेवण्यात आली आहे, हा स्मार्टफोन वॅमी टायटन ४चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी केला जाऊ शकतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची IPS OGS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे रिझोल्युशन १०८०x१९२० पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता ४०१ppi आहे. त्यासोबतच हा स्मार्टफोन १.३GHzऑक्टा-कोर मीडियाटेक MT6753M चिपसेट, ३जीबी रॅम आणि ARM माली-T720 GPUने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. ह्या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात फिंगरप्रिंट सेंसर आहे, जो ३६० डिग्री रेकॉग्निशन वैशिष्ट्याने सुसज्ज आहे. हा सेंसर रियर पॅनलवर कॅमे-याच्या खाली आहे. हा एक ड्युल सिम ड्युल स्टँडबाय डिवाईस आहे, जो अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

त्याशिवाय विकेडलीक वॅमी टायटन ५ स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात ४१६५mAhची बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, वायफाय ८०२.११B/G/N,AC ब्लूटूथ 4.0, GPS/A-GPS, हॉटनॉट आणि मायक्रो-USB वैशिष्ट्याने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनची परिमाणे १५५.२x७६.९x८mm आहे. ह्याचे वजन २०३ ग्रॅम आहे. त्याचबरोबर हा एंबियट लाईट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, एक्सेलेरोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि गायरोस्कॉपसोबत येईल. हा सोनेरी, पांढरा -चंदेरी आणि गडद राखाडी चंदेरी अशा तीन रंगात उपलब्ध होईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo