लावा फ्लेअर E2 स्मार्टफोन लाँच, किंमत २,९९९ रुपये

HIGHLIGHTS

ह्या स्मार्टफोनमध्ये 1GHz सिंगल-कोर प्रोसेसर आणि २५६ एमबीची रॅम दिली गेली आहे. त्यासोबतच ह्या स्मार्टफोनमध्ये ५१२एमबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे.

लावा फ्लेअर E2 स्मार्टफोन लाँच, किंमत २,९९९ रुपये

मोबाईल निर्माता कंपनी लावाने आपला नवीन स्मार्टफोन फ्लेअर E2 लाँच केला आहे. सध्या तरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाईटच्या यादीत समाविष्ट केले आहे. आणि ह्याची किंमत आहे २,९९९ रुपये. हा स्मार्टफोन लवकरच कंपनीच्या रिटेल चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ह्यात ३.५ इंचाची HVGA डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन ३२०x४८० पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1GHz सिंगल-कोर प्रोसेसर आणि २५६जीबीची रॅम दिली गेली आहे. त्यासोबतच ह्या स्मार्टफोनमध्ये ५१२MB ची अंतर्गत स्टोरेज दिली गेली आहे, ज्यामुळे मायक्रो-एसडी कार्डद्वारा ते १६जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

 

लावा फ्लेअर E2 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशचा २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, लावा फ्लेअर E2 GPRS/एज, A-GPS, वाय-फाय ८०२.११ B/G/N, मायक्रो-युएसबी आणि ब्लूटुथ वैशिष्ट्य दिले गेले आहे. त्यासोबतच ह्या स्मार्टफोनमध्ये १४००mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा १४ तासांपर्यंत टॉकटाईम आणि १२८ तासांपर्यंत स्टँडबाय वेळ देईल. हँडसेटचे आकारमान ११३x६१x१२ मिलीमीटर आहे आणि वजन आहे २५६ ग्रॅम. हा नवीन लावा स्मार्टफोन आपल्याला काळ्या आणि पांढ-या रंगात उपलब्ध होईल.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo