65 Inch Smart TV Deals: आता घरबसल्या मिळेल स्टेडियमची मज्जा! क्रिकेट लव्हर्ससाठी मोठ्या टीव्हीवर Best ऑफर्स

Updated on 26-Feb-2025
HIGHLIGHTS

ICC Champions Trophy 2025 क्रिकेट लव्हर्ससाठी हा एक मोठा उत्सव आहे.

विशेष म्हणजे सध्या Amazon वर Stadium At Home सेल सुरू आहे.

सेलदरम्यान मोठ्या स्क्रीनच्या स्मार्ट TV वर बंपर सवलती उपलब्ध आहेत.

65 Inch Smart TV Deals: आपणा सर्वांना माहितीच आहे की, ICC Champions Trophy 2025 सध्या सुरू आहे. क्रिकेट लव्हर्ससाठी हा एक मोठा उत्सव असतो. जर तुम्ही देखील क्रिकेटप्रेमी असाल आणि घरबसल्याच स्टेडियमसारखा अनुभव घेऊ इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्या घरासाठी मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. विशेष म्हणजे सध्या Amazon वर Stadium At Home सेल सुरू आहे, हा सेल खास क्रिकेट लव्हर्स करता आहे. या सेलदरम्यान तुम्ही परवडणाऱ्या किमतीत मोठ्या स्क्रीन साईजचे स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी निवडक आणि बेस्ट टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-

Also Read: लेटेस्ट Infinix 40Y1V QLED भारतात लाँच! किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी, स्वस्तात मिळतोय मोठा Smart TV

Sony Bravia 65 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony Bravia 65 inches 4K Ultra HD Smart LED Google TV सध्या 54% सवलतीसह अमेझॉनवरून 64,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बँक कार्डद्वारे टीव्हीवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑडिओसाठी, यात 20W चे स्पीकर्स आहेत, ज्यांना डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे. हे गुगल टीव्ही आहे, ज्याला ओके गुगलचा सपोर्ट आहे. टीव्ही खरेदी करण्यासाठी Amazon ला भेट द्या.

VW 65 inches Pro Series 4K Ultra HD Smart QLED Google TV

VW 65 inches Pro Series 4K Ultra HD Smart QLED Google TV हा या श्रेणीतील सर्वात स्वस्त टीव्ही आहे. हा टीव्ही Amazon वर 49% सवलतीसह फक्त 40,990 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या टीव्हीवर तुम्हाला 1000 रुपयांचा डिस्काउंट कूपन मिळेल. तसेच, बँक कार्डद्वारे 2000 रुपयांची सूट दिली जात आहे. ऑडिओसाठी, या टीव्हीमध्ये 88W साउंड आउटपुट आहे.

Samsung 65 inches D Series Brighter Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV

Samsung 65 inches D Series Brighter Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV सध्या Amazon वरून 29% सवलतीसह उपलब्ध आहे. हा टीव्ही सवलतीसह 70,490 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास. बँक कार्डद्वारे या टीव्हीवर 2000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. लक्षात घ्या की, यात 20W चा ऑडिओ आउटपुट आहे. वरील सर्व ऑफर्सबद्दल अधिक माहितीसाठी Amazon India ला भेट द्या. लक्षात घ्या की, सेलदरम्यान वरील टीव्हीच्या किमती बदलत राहू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :