लेटेस्ट Infinix 40Y1V QLED भारतात लाँच! किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी, स्वस्तात मिळतोय मोठा Smart TV
Infinix ने Infinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्ही भारतीय बाजारात लाँच केला आहे.
Infinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे.
नवा स्मार्ट टीव्ही सध्या विशेष किमतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रसिद्ध टेक कंपनी Infinix ने Infinix 40Y1V QLED Smart TV भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हा स्वस्त टीव्ही मोठ्या डिस्प्लेसह सादर केला आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, या सेगमेंटमधील हा पहिला स्मार्ट टीव्ही आहे, जो परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम डिस्प्ले आणि साउंड फीचर्ससह येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये अनेक पॉवरफूल फीचर्स मिळत आहेत. जर तुम्हाला देखील स्वस्तात मोठा आणि लेटेस्ट टीव्ही हवा असेल तर, हा टीव्ही एक योग्य पर्याय आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Infinix 40Y1V QLED नव्या स्मार्ट टीव्हीची किंमत-
SurveyInfinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्हीची किंमत
Infinix कंपनीने Infinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्ही सध्या 13,999 रुपयांच्या विशेष किमतीत लाँच केला आहे. लक्षात घ्या की, ही किंमत केवळ मर्यादित कालावधीपर्यंत उपलब्ध आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्ट टीव्ही अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येणार आहे. या स्मार्ट टीव्हीची विक्री 1 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे. हा टीव्ही स्पेशल किमतीत खरेदी करण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल.

Infinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्हीचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix 40Y1V QLED स्मार्ट टीव्हीमध्ये 40-इंच लांबीचा फुल HD+ QLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा पिक्सेल रिझोल्यूशन 1920x 1080 आहे, रिफ्रेश रेट 60Hz आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर आणि माली-जी31 ग्राफिक्स प्रोसेसर देण्यात आला आहे.कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये दोन HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट आणि LAN पोर्ट आहे. याशिवाय, टीव्हीमध्ये बिल्ट-इन वाय-फाय आणि आरएफ पोर्ट आहे. याव्यतिरिक्त, या स्मार्ट टीव्हीमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.
इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात संगीत, चित्रपट, स्टॅंडर्ड आणि वापरकर्ता यासह वेगवेगळ्या प्रसंगांसाठी पाच साउंड मोड आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये स्क्रीन मिररिंग फीचर देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉप, फोन इत्यादींद्वारे देखील टीव्हीवरील कंटेंट स्ट्रीम करू शकता. या टीव्हीमध्ये 4GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये YouTube, JioHotstar, Prime Video, SonyLiv आणि Zee5 यासह अनेक स्ट्रीमिंग ऍप्स प्री-इंस्टॉल केलेले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile