150Mbps च्या स्पीड सह वोडाफोन ने नवीन R217 4G MiFi डिवाइस केला लॉन्च
डिवाइस मध्ये 1,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्या बद्दल बोलेल जात आहे की एकदा चार्ज करून हा 7 तास वापरता येतो.
Vodafone launched new R217 4G MiFi device with 150Mbps speed: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वोडाफोन अनेक मोबाइल डेटा प्लान्स मध्ये बदल करत आहे किंवा नवीन प्लान्स आणत आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना या ऑफर्स चा लाभ पण मिळत आहे पण आता कंपनी ने Wi-Fi डिवाइसेज कडे लक्ष्य द्यायला सुरवात केली आहे आणि आपला नवीन डिवाइस लॉन्च केला आहे.
वोडाफोन ने आपला नवीन R217 4G MiFi डिवाइस लॉन्च केला आहे. हा डिवाइस खुप पोर्टेबल आहे आणि याचे डायमेंशन 87.6×59.6×12.9mm आहे तसेच या पोर्टेबल डिवाइस चे वजन 78 ग्राम आहे. TelecomTalk च्या रिपोर्ट नुसार, या मधून एकाच वेळी 15 यूजर्स 150Mbps पर्यंतच्या स्पीड ने Wi-Fi वापरू शकतात. हा डिवाइस 150Mbps पर्यंतचा डाउनलिंक आणि 50Mbps पर्यंत अपलिंक स्पीड देऊ शकतो. LTE कनेक्शन साठी हा 800/900/1800/2100 Mhz बँड्ज वापरतो आणि GSM साठी 900/1800 Mhz बँड्ज वापरतो.
डिवाइस मध्ये 1,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्या बद्दल बोलेल जात आहे की एकदा चार्ज करून हा 7 तास वापरता येतो. तसेच डिवाइस मध्ये माइक्रो SD कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे जो 32GB पर्यंतच्या कार्ड्स ला सपोर्ट करतो. सुरक्षा पाहता या MiFi डिवाइस ला WPS ऑथेंटिकेशन देण्यात आले आहे. यूजर्स हॉटस्पॉट मोनिटरिंग अॅप मधून Wi-Fi यूसेज बघू शकतात. डिवाइस मध्ये एक प्लग-एंड-प्ले वेब यूजर इंटरफेस पण आहे.
वोडाफोन या डिवाइस च्या माध्यमातुन रिलायंस जियो, एयरटेल आणि BSNL ला टक्कर देऊ पाहत आहे. या कंपन्या खुप आधी पासून MiFi डिवाइसेज सादर करत आहेत आणि आता आपले लक्ष्य ब्रॉडबँड सेक्टर वर केंद्रित केले आहे.