Vi unlimited data plan: 17 രൂപയ്ക്കും 57 രൂപയ്ക്കും ഇനി അൺലിമിറ്റഡ് ഡാറ്റ
Vodafone-Idea ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. VI ने आपल्या दोन प्लॅन्समध्ये बदल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. कंपनीने आपल्या 129 आणि 298 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे रिवाईज केले आहेत. आता या दोन्ही प्लॅनमध्ये काय नवीन मिळेल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक असणार. चला तर मग जास्त वेळ न घालवता सरळ मुद्द्यावर येऊ –
या प्लॅनमध्ये आता 18 दिवसांची वैधता मिळते. त्यासोबतच, अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 200MB डेटा मिळतो. मात्र, यात कुठलेही SMS लाभ दिले गेले नाहीत. लोकल SMS साठी 1 रुपया आणि STD SMS साठी 1.5 रुपया इतके शुल्क भरावे लागेल.
VI च्या 298 रूपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 50GB डेटा मिळणार आहे. तसेच, यासह VI मुव्हीज आणि TV क्लासिकचे ॲक्सेसदेखील मिळणार आहे.
अलीकडेच, VI ने नवीन काही नवीन प्लॅन सादर केलेले आहेत. सध्या VI च्या नव्या 181 रूपयांच्या प्लॅनची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे. हा प्लॅन संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह येतो. त्याबरोबरच, कंपनीने 289 आणि 429 रुपयांचे प्लॅन्स लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन्स 78 दिवसांच्या वैधतेसह येतात. नव्या प्लॅन्समध्ये तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स मिळतील. अधिक माहितीसाठी VI च्या अधिकृत वेबसाईटला विजिट करा.