VI च्या दोन प्लॅन्समध्ये झाले मोठे बदल, ग्राहकांची तर आता मज्जाच मजा!

HIGHLIGHTS

VI चा नवीन 129 रूपयांचा प्लॅन

VI चा नवीन 298 रूपयांचा प्लॅन

अलीकडेच, VI ने नवीन काही नवीन प्लॅन लाँच केले.

VI च्या दोन प्लॅन्समध्ये झाले मोठे बदल, ग्राहकांची तर आता मज्जाच मजा!

Vodafone-Idea ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. VI ने आपल्या दोन प्लॅन्समध्ये बदल केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. कंपनीने आपल्या 129 आणि 298 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे रिवाईज केले आहेत. आता या दोन्ही प्लॅनमध्ये काय नवीन मिळेल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक असणार. चला तर मग जास्त वेळ न घालवता सरळ मुद्द्यावर येऊ –

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

VI चा 129 रूपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये आता 18 दिवसांची वैधता मिळते. त्यासोबतच, अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 200MB डेटा मिळतो. मात्र, यात कुठलेही SMS लाभ दिले गेले नाहीत. लोकल SMS साठी 1 रुपया आणि STD SMS साठी 1.5 रुपया इतके शुल्क भरावे लागेल. 

VI चा 298 रूपयांचा प्लॅन 

VI च्या 298 रूपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध असणार आहे. यामध्ये ग्राहकांना एकूण 50GB डेटा मिळणार आहे. तसेच, यासह VI मुव्हीज आणि TV क्लासिकचे ॲक्सेसदेखील मिळणार आहे.

VI चे नवीन लाँच झालेले प्लॅन्स

अलीकडेच, VI ने नवीन काही नवीन प्लॅन सादर केलेले आहेत. सध्या VI च्या नव्या 181 रूपयांच्या प्लॅनची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे. हा प्लॅन संपूर्ण महिन्याच्या वैधतेसह येतो. त्याबरोबरच, कंपनीने 289 आणि 429 रुपयांचे प्लॅन्स लाँच केले आहेत. हे दोन्ही प्लॅन्स 78 दिवसांच्या वैधतेसह येतात. नव्या प्लॅन्समध्ये तुम्हाला अप्रतिम बेनिफिट्स मिळतील. अधिक माहितीसाठी VI च्या अधिकृत वेबसाईटला विजिट करा. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo