Jio New Rs 49 Plan Announced 2024
Jio ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 49 रुपयांचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा नवीन डेटा पॅक आहे. हा प्लॅन क्रिकेट ऑफर अंतर्गत सादर करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर हा IPL 2024 सामना थेट पाहण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भरपूर डेटाची गरज आहे. तुमची ही गरज लक्षात घेऊनच, Jio ने आपल्या ग्राहकांसाठी 49 रुपयांचा स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. जाणून घेऊयात प्लॅनमधील फायदे-
Jio चा नवीन प्लॅन फक्त 49 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनची वैधता फक्त 1 दिवस आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये फक्त एका दिवसाची वैधता असेल तरी, या प्लॅन अंतर्गत तुम्हाला उपलब्ध डेटा लाभ मिळेल. यामध्ये Jio केवळ 2GB किंवा 3GB डेटा नाही तर तब्बल 25GB डेटा मिळणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, 25GB डेटासह तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय JioCinema ॲपवर IPL 2024 सामना ऑनलाइन पाहू शकता.
मात्र, परत एकदा लक्षात घ्या की, या प्लॅनची एका दिवसाची वैधता संपल्यास तुम्हाला उर्वरित डेटा लाभ दुसऱ्या दिवशी मिळणार नाही. केवळ वैधतेदरम्यानच तुम्ही 25GB डेटाचा ऍक्सेस घेऊ शकता.
जर तुम्हाला 49 रुपयांचा डेटा पॅकची वैधता कमी वाटत असेल, तर तुम्ही जास्त वैधता असलेला डेटा पॅक खरेदी करू शकता. दीर्घकालीन वैधतेसह येणाऱ्या डेटा प्लॅनची किंमत 301 रुपये आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण 1 महिन्याची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा बेनिफिट्सदेखील उत्तम आहेत. या प्लॅन अंतर्गत तुम्हाला 50GB डेटाचा ॲक्सेस मिळतो.
या व्यतिरिक्त, 444 रुपयांच्या रिचार्जवर 100GB डेटाचा ॲक्सेस मिळेल, ज्याची वैधता 60 दिवसांपर्यंत आहे. तर, 150GB डेटा पॅकची किंमत 667 रुपये आहे. हा प्लान 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर वैधतेआधी तुम्ही हा डेटा संपवला तर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो.