IPL 2024 पाहण्यासाठी Jio चे Best प्लॅन्स! दैनंदिन 3GB डेटासह Unlimited बेनिफिट्सदेखील उपब्ध

IPL 2024 पाहण्यासाठी Jio चे Best प्लॅन्स! दैनंदिन 3GB डेटासह Unlimited बेनिफिट्सदेखील उपब्ध
HIGHLIGHTS

IPL 2024 सामने विविध प्लॅटफॉर्मवर थेट दाखवले जातील.

जर तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि IPL मॅचेस पाहण्याची विशेष प्लॅन्स उपलब्ध

JIO चा 219 रुपयांचा प्लॅन हा 3GB डेटासह JIO चा सर्वात छोटा प्लॅन आहे.

IPL 2024 चा नवा हंगाम येत्या शुक्रवारी 22 मार्चपासून सुरू होत आहे. IPL 2024 सामने विविध प्लॅटफॉर्मवर थेट दाखवले जातील. क्रिकेट सामने प्रसारित करणाऱ्या टेलिव्हिजन चॅनेल, JioCinema ॲप सारख्या ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवा आणि अधिकृत IPL वेबसाइट वर दाखवले जाणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि IPL मॅचेस पाहण्याची प्लॅन्स शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बघुयात प्लॅन्सची यादी-

JIO चा 219 रुपयांचा प्लॅन:

JIO चा 219 रुपयांचा प्लॅन हा 3GB डेटासह JIO चा सर्वात छोटा प्लॅन आहे. हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत 2GB अतिरिक्त डेटा मिळतो. त्यानुसार प्लॅनमध्ये एकूण 44GB इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. यासोबतच दररोज 100 SMS आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध असेल. त्याबरोबरच, काही JIO ॲप्सची सुविधा उपलब्ध असेल.

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन:

JIO च्या 399 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे. जिथे कंपनी दररोज 3GB इंटरनेट डेटा देत आहे. रोजच्या डेटाशिवाय प्लॅनमध्ये 6GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. त्यानुसार प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा उपलब्ध आहे. त्याबरोबरच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगच्या सुविधेसोबत दररोज 100SMS आणि JIO ॲप्स उपलब्ध आहेत.

Jio Cricket Packs for the IPL 2024
Jio Cricket Packs for the IPL 2024

JIO चा 999 रुपयांचा प्लॅन:

JIO च्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. वैधतेदरम्यान तुम्हाला एकूण 292GB डेटा मिळणार आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला मोफत Jio ॲप्स आणि दररोज 100SMS सोबत देशभरात कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग मिळेल. यासह तुम्ही क्रिकेटचे सामने विना अडथड्याने बघू शकता.

JIO चा 1,499 रुपयांचा प्लॅन:

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये देखील वैधता 84 दिवस आहे. या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100 SMSचा लाभ देखील मिळेल. याशिवाय, प्लॅनमध्ये Netflix Basic चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo