BSNL : 6 महिन्यांसाठी दररोज 2GB डेटा, 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त प्लॅन

Updated on 03-Jan-2023
HIGHLIGHTS

BSNLचा 6 महिन्यांच्या वैधतेसह येणारा प्लॅन

BSNL चा 397 रुपयांचा प्लॅन

दररोज मिळेल 2 GB इंटरनेट डेटा

BSNL आपल्या ग्राहकांसाठी कमी किमतीत उत्तम बेनिफिट्ससह प्लॅन्स ऑफर करते. या प्लॅन्सची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये दीर्घ वैधता, डेटा आणि इतर फायदे देखील आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला BSNL च्‍या अशा प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, जेणेकरुन रिचार्ज केल्‍यानंतर तुम्‍हाला 6 महिने रिचार्ज करण्‍याचा ताण राहणार नाही. इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत, या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त वैधता आणि इतर फायदे उपलब्ध आहेत आणि किंमत देखील इतरांपेक्षा कमी आहे.

हे सुद्धा वाचा : Redmi ने लॉन्च केला स्वस्त स्मार्टफोन, बघुयात किंमत आणि स्टायलिश लुक

BSNL चा रु. 397 प्लॅन

तुम्ही हा प्लॅन 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत सक्रिय करून घेऊ शकता, त्याची किंमत फक्त 397 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB हायस्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला 6 महिन्यांसाठी रिचार्जच्या टेन्शनपासून मुक्ती मिळेल. 

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल. जरी कंपनी त्याच्यासोबत OTT ऍप्स इत्यादींचे सबस्क्रिप्शन देत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, प्लॅनमध्ये उपलब्ध दैनिक 2GB डेटा संपल्यानंतरही तुमचे इंटरनेट कनेक्शन बंद होणार नाही. येथे वेग 40Kbps पर्यंत कमी होतो. अशा प्रकारे, तुम्हाला या प्लॅनमध्ये संपूर्ण 360GB डेटाचा लाभ मिळेल.

ज्या वापरकर्त्यांना दीर्घ वैधतेसह भरपूर डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर आहे. तसेच, या प्लॅनचा वापर कोणत्याही सिमला दीर्घकाळ सक्रिय ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :