BSNL चा भारी रिचार्ज प्लॅन! तब्बल 160 दिवसांच्या वैधतेसह मिळेल भरपूर इंटरनेट आणि Unlimited कॉलिंगचे लाभ। Tech News

Updated on 30-Apr-2024
HIGHLIGHTS

BSNL च्या 997 रुपयांच्या प्लॅनसह तुम्हाला अनोखे बेनिफिट्स मिळतात.

BSNL च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो.

जवळपास समान किमतीत येणारे इतर कंपन्यांचे प्लॅन्सदेखील बघा.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी अनेक उत्तमोत्तम रिचार्ज प्लॅन आहेत. हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला BSNL च्या एका शानदार प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 160 दिवसांच्या वैधतेसह येणार डेटा आणि कॉलिंगचा लाभ देखील मिळतो. जाणून घेऊयात सविस्तरपणे या प्लॅनची ​​किंमत आणि BSNL रिचार्ज प्लॅनसह उपलब्ध असलेले बेनिफिट्स-

हे सुद्धा वाचा: Attractive डिझाईनसह येणारा Nothing Phone 2a नव्या रंगात भारतात लाँच, जाणून घ्या काय विशेष? Tech News

BSNL चा 997 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 997 रुपयांच्या प्लॅनसह तुम्हाला अनोखे बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये कंपनी 160 दिवसांची वैधता ऑफर करत आहे. विना अडथडा इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो. लक्षात घ्या की, डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर स्पीड 40kbps पर्यंत कमी होईल.

एवढेचं नाही तर, या प्लॅनमध्ये डेटाशिवाय अमर्यादित व्हॉईस (Local+ STD) कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. डेटा आणि कॉलिंगसोबत या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100SMS देखील दिले जात आहेत. डेटा, कॉलिंग आणि SMS फायद्यांव्यतिरिक्त या प्लॅनसह कंपनी लोकधुन कंटेंटचा मोफत ऍक्सेस आणि 2 महिन्यांसाठी पर्सनलाइझ्ड रिंग बॅक टोन PRBT ऍक्सेस देखील देत आहे.

जवळपास समान किमतीत येणारे इतर कंपन्यांचे प्लॅन्स

वरील प्लॅनप्रमाणे जवळपास कमी किमतीचा Jio चा 999 रुपयांच्या प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 40GB डेटा दररोज 3GB डेटासोबत मोफत उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता 84 दिवसांची आहे. त्यानुसार या प्लॅनमध्ये एकूण 292GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Jio ॲप्स आणि दररोज 100 SMS मिळतील.

त्याचप्रमाणे, Airtel कडे सुद्धा 999 रुपयांचा प्लॅन आहे. या रिचार्जमध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. हा प्लॅन देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, प्लॅन Amazon Prime सबस्क्रिप्शनचा लाभ मिळेल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :