Airtel चे सर्वात जबरदस्त प्लॅन्स! Unlimited बेनिफिट्ससह हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळेल अगदी मोफत। Tech News

Updated on 16-Apr-2024
HIGHLIGHTS

Airtel वापरकर्ते Disney + Hotstar OTT प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत वापरू शकतात.

तुम्हाला Disney+Hotstar चे सदस्यत्व घ्यायचे असेल, तर तुम्ही Airtel चे काही निवडक प्लॅन खरेदी करू शकता.

Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो.

रसिक प्रेक्षकांसाठी Airtel कडे अनेक अप्रतिम प्लॅन्स आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Airtel वापरकर्ते Disney+Hotstar OTT प्लॅटफॉर्म पूर्णपणे मोफत वापरू शकतात. होय, जर तुम्हाला Disney+Hotstar चे सदस्यत्व घ्यायचे असेल, तर तुम्ही ते Airtel चे काही निवडक प्लॅन खरेदी करू शकता. या प्लॅन्ससह OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात Airtel चे Disney+Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे प्लॅन्स-

हे सुद्धा वाचा: एका वर्षाच्या वैधतेसह येणारा Vodafone Idea चा Best प्लॅन, मिळेल तब्बल 850GB डेटा आणि अप्रतिम बेनिफिट्स। Tech News

Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतो, ज्याची वैधता 3 महिन्यांसाठी आहे. याशिवाय, या प्लॅनमध्य दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100SMS मिळतील.

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना दररोज 3GB डेटा ऑफर करतो. यामध्ये तुम्हाला 100SMS आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये Disney+Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनची वैधता एकूण 28 दिवसांची आहे.

Airtel चा 839 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 839 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, अमर्यादित कॉलिंग आणि 100SMS मिळतील. OTT बेनिफिट्समध्ये Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. त्याबरोबरच, रिचार्जमध्ये Xstream ॲप, Apollo 24×7 Circle, Wynk Music आणि RewardsMini चे सदस्यत्व उपलब्ध आहे. हा प्लॅन एकूण 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.

airtel disney+hotstar

Airtel चा 869 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 84 दिवसांसाठी दररोज कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित विनामूल्य कॉलिंगची सुविधा मिळेल. डेटा वापरासाठी तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल, म्हणजेच तुम्ही संपूर्ण वैधतेमध्ये 168GB डेटा वापरू शकता. तुम्हाला दररोज 100SMS देखील मिळतील. तुम्हाला या प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी Airtel Disney + Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल.

Airtel चा 3,359 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या 365 दिवसांच्या वैधतेच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS चे लाभ मिळणार आहेत. तर, OTT सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनसह 1 वर्षासाठी Wynk Musc ॲप्सचे सदस्यत्व देखील दिले जाईल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :