Vodafone Idea VI ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. VI कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रकारचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. जर तुम्ही VI वापरकर्ता असाल तर हा रिपोर्ट फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला VI कंपनीच्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो केवळ दीर्घ वैधताच नाही तर भरपूर डेटा लाभही मिळतो. Vi च्या या प्लॅनमधील किंमत आणि फायदे जाणून घेऊयात-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Vodafone Idea चा 850GB डेटा प्लॅन
Vodafone Idea च्या या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे. कंपनीच्या अनन्य रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दीर्घ वैधतेसह बरेच डेटा फायदे दिले जातात. होय, या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 850GB डेटाचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त डेटा देणारा प्लान शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे.
Vodafone Idea (Vi) ची 2,999 रुपयांचा प्लॅन दीर्घकाळ वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना संपूर्ण 365 दिवसांची म्हणजेच पूर्ण 1 वर्षाची वैधता मिळते. म्हणजेच तुम्ही या प्लॅनअंतर्गत उपलब्ध 850GB डेटा वैधतेदरम्यान कधीही वापरू शकता. केवळ डेटाच नाही तर Vi च्या या प्लानमध्ये यूजर्सना इतर टेलिकॉम फायदे देखील मिळतात. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील आहे.
होय, तुम्हाला या प्लॅनसह वर्षभर कॉलिंग लाभ मिळणार आहे. तुम्ही पूर्ण वर्षभर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 मोफत SMS पाठविण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. वर सांगितलेले सर्व लाभ तुम्हाला संपूर्ण वर्षभरासाठी मिळणार आहेत.
एवढेचं नाही तर, हा प्लॅन काही इतर बेनिफिट्ससह देखील येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड नाईट डेटाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांना मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोफत अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. लक्षात घ्या की, हा डेटा कोटा वापरकर्त्यांच्या दैनंदिन डेटा कोट्यातून वजा केला जात नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile