airtel new plans
TRAI च्या सूचना लक्षात घेऊन, प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि SMS दिले जात आहेत. मात्र, लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये सामान्य प्लॅनप्रमाणे इंटरनेट वापरण्यासाठी डेटा लाभ उपलब्ध नाही. तसेच, OTT सारखे इतर फायदे देखील मिळणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, TRAI ने ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी व्हॉइस आणि SMS सह स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STVs) सुरू करण्याचे आदेश दिले होते. पहा नव्या प्लॅन्सची किंमत-
Airtel च्या या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 509 रुपये इतकी आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दिले जात आहेत. तसेच, या पॅकमध्ये तुम्हाला तब्बल 900SMS ची सुविधा मिळणार आहे. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यासह एअरटेल एक्स्ट्रीम ॲप, अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप आणि हॅलो ट्यूनचा मोफत ऍक्सेस देखील दिला जात आहे. या लेटेस्ट प्लॅनची वैधता संपूर्ण 84 दिवसांची आहे.
दूरसंचार कंपनी Airtel च्या दुसऱ्या नव्या प्लॅनची किंमत 1,999 रुपये इतकी आहे. हा प्रीपेड प्लॅन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी जारी केला आहे, ज्यांना दीर्घ वैधतेसह येणारे प्लॅन्स हवेत आहेत. प्लॅनमधील उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 3600SMS दिले जात आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.
वरील रिचार्ज प्लॅन प्रमाणे, Airtel Extreme App, Apollo 24/7 Circle आणि Hello Tune चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या प्लॅनची वैधता संपूर्ण एका वर्षाची आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही नवीन प्रीपेड प्लॅन ग्राहकांसाठी Airtel Thanks ॲप आणि अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज करता येतात किंवा रिचार्ज खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!
यूजर्ससाठी 398 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या पॅकमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिला जात आहे. यामध्ये अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. OTT बद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये डिजनी+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जात आहे. रिचार्ज खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!