Airtel Recharge Plan
Airtel New Plan: प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Airtel ने आपला आंतरराष्ट्रीय रोमिंग पोर्टफोलिओ वाढवला आहे. होय, या अंतर्गत कंपनीने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. जागतिक कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन विशेषतः सादर करण्यात आला आहे. याअंतर्गत, 189 देशांमध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांना अमर्यादित हाय-स्पीड डेटा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात Airtel चा नवा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Also Read: Motorola Edge 60 Pro फोनची लाँच डेट जाहीर! जबरदस्त फीचर्ससह होणार भारतात दाखल
टेलिकॉम कंपनी Airtel च्या मते, नवीन आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनची किंमत 4000 रुपये आहे. या पॅकमध्ये एक वर्षाची वैधता दिली जात आहे. यामध्ये इंटरनेट वापरासाठी 5GB डेटा दिला जात आहे. कॉलिंगसाठी 100 व्हॉइस मिनिटे आणि 100SMS मिळत आहेत. या सर्व सुविधा त्या अनिवासी भारतीयांना उपलब्ध असतील, जे बराच काळ देशाबाहेर आहेत.
प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, वर नमूद केलेल्या प्लॅनचा रिचार्ज केल्यानंतर इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल. दुसऱ्या देशात उतरल्यानंतर, सिम आपोआप ऍक्टिव्ह होईल आणि 24 तास ग्राहक समर्थन उपलब्ध असेल. हा प्लॅन 189 देशांमध्ये वापरला जाऊ शकतो. परदेशात वारंवार प्रवास करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ऑटो-नूतनीकरण फीचर देखील यात जोडण्यात आले आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. त्याची किंमत परदेशात विकल्या जाणाऱ्या सिमपेक्षा कमी आहे. लक्षात घ्या की, एअरटेल थँक्स ऍपद्वारे बिल तपासण्यासोबतच डेटा रिचार्ज करता येतो. जर हा प्लॅन भारतात रिचार्ज केला तर वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा दिला जाईल. इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अमर्यादित कॉलिंग दिले जाईल. याव्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS मिळतील.