Motorola Edge 60 Pro फोनची लाँच डेट जाहीर! जबरदस्त फीचर्ससह होणार भारतात दाखल
अलीकडेच कंपनीने जागतिक बाजारात Motorola Edge 60 सिरीज लाँच केली आहे.
अखेर Motorola Edge 60 Pro स्मार्टफोनची भारतीय लाँचिंग तारीख जाहीर
हा स्मार्टफोन 30 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल.
Motorola Edge 60 Pro च्या लॉन्चिंगची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता अखेर Motorola Edge 60 Pro स्मार्टफोनची लाँचिंग तारीख जाहीर करण्यात आली आहे. अलीकडेच कंपनीने जागतिक बाजारात Motorola Edge 60 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत, कंपनीने Motorola Edge 60 आणि Motorola Edge 60 Pro हे दोन स्मार्टफोन आणले आहेत. आता कंपनीने भारतात या सिरीजमधील प्रो स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीखही जाहीर केली आहे. जाणून घेऊयात संपूर्ण तपशील-
SurveyAlso Read: 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Realme 14T 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
Motorola Edge 60 Pro लाँच डेट
मोटोरोला इंडियाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करून Motorola Edge 60 Pro स्मार्टफोनच्या लाँचिंग तारखेची घोषणा केली आहे. पोस्टनुसार, हा स्मार्टफोन 30 एप्रिल 2025 रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल.

लक्षात घ्या की, वर सांगितल्याप्रमाणे हा फोन आधीच जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. यामुळे, फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइन आधीच उघड आहेत. भारतात देखील हा फोन समान फीचर्ससह प्रवेश करेल, अशी आशा आहे.
Motorola Edge 60 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स
ग्लोबल व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने Motorola Edge 60 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा क्वाड कर्व pOLED डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी, हा फोन गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो. पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षणासाठी या फोनला IP68/69 रेटिंग देण्यात आले आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
स्मार्टफोनमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी, मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 एक्स्ट्रीम प्रोसेसर आहे, जो 4nm प्रक्रियेवर आधारित आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 90W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येतो. तसेच, हा फोन 15W वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 10MP चा टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या पुढील बाजूस 50MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile