50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह Realme 14T 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील
Realme ने Realme 14T 5G आज भारतात लाँच केला आहे.
Realme 14T 5G कंपनीचा पहिला स्वतंत्र T-सिरीजचा स्मार्टफोन आहे.
या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 45W सुपरव्हीओसी चार्जिंगसाठी सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने Realme 14T 5G आज भारतात लाँच केला आहे. हा फोन लोअर मिडरेंज फोन म्हणून सादर करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला स्वतंत्र T-सिरीजचा स्मार्टफोन आहे. या सेगमेंटमध्ये रियलमीचा दावा आहे की, तो एक चांगला AMOLED डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरीसह येतो. चला तर मग या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Oppo A5 Pro 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आज, जाणून घ्या Best ऑफर्स
Realme 14T 5G ची किंमत
Realme 14T 5G च्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, ज्याची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 14T 5G फ्लिपकार्ट आणि Realme वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन ऑब्सिडियन ब्लॅक, लाइटनिंग पर्पल आणि माउंटन ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.
Realme 14T 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Realme 14T 5G मध्ये 6.67-इंचाची AMOLED FHD+ स्क्रीन आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल मेमरीसह येतो. अंतर्गत मेमरीच्या मदतीने रॅम 18GB पर्यंत वाढवता येईल. तर, मायक्रो-SD कार्डच्या मदतीने मेमरी 2TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी, Realme 14T 5G फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, तर 2MP मोनोक्रोम लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. मागील कॅमेरा 10x पर्यंत डिजिटल झूमसह प्रदान केला आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी 45W सुपरव्हीओसी चार्जिंगसाठी सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन फक्त 88 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होऊ शकतो. यासोबतच, 6W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile