Vivo Y200 Pro 5G चे भारतीय लाँच अखेर Confirm! आगामी फोनमध्ये मिळेल 3D कर्व डिस्प्ले, बघा टिझर Video। Tech News

Updated on 16-May-2024
HIGHLIGHTS

Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी

Vivo Y200 Pro 5G फोनची पहिली झलक टीझर Video मध्ये बघा.

Vivo Y200 Pro 5G फोन सर्वात स्लिम 3D कर्व डिस्प्लेसह येईल.

Vivo ने मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपले तीन लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले. ज्यामध्ये Vivo V30e, Vivo Y18 आणि Vivo Y18e या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. दरम्यान, आता Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची पुष्टी झाली आहे. हा फोन लवकरच भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीने लेटेस्ट टीझर VIDEO द्वारे दिली आहे. टीझर व्हिडिओमध्ये फोनची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Vivo Y200 Pro 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

हे सुद्धा वाचा: 50MP कॅमेरा आणि मोठ्या बॅटरीसह लेटेस्ट Redmi 12 5G फोन Discount सह खरेदी करण्याची संधी, बघा Best ऑफर्स

Vivo Y200 Pro 5G

Vivo India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Vivo Y200 Pro 5G स्मार्टफोनचा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. टीझर व्हिडिओद्वारे फोनच्या भारतातील लाँचची पुष्टी देखील झाली आहे. सध्या कंपनीने फोनची लाँच डेट उघड केली नाही. तर, हे फोन नुकतेच ‘Coming Soon’ टॅगसह टीज केले गेले आहे. या Video सह कंपनीने माहिती दिली आहे की, हा फोन सर्वात स्लिम 3D कर्व डिस्प्लेसह येईल.

Vivo Y200 Pro 5G फोनची पहिली झलक देखील वरील टीझर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. समोर एक कर्व डिस्प्ले दिसू शकतो. त्याबरोबरच, बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने कॅमेरा मॉड्यूलमध्ये LED फ्लॅशचा देखील दिला आहे.

Vivo Y200 Pro 5G चे लीक डिटेल्स

या Vivo Y सीरीज फोनशी संबंधित अनेक तपशील ऑनलाइन समोर आले आहेत. लीकवर विश्वास ठेवला तर हा, हा फोन 6.78 इंच लांबीच्या फुल HD+ AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. याशिवाय, हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, हा फोन Android 14 वर काम करेल, अशी अपेक्षा आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाईल. या फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा मिळेल, जो OIS सपोर्टसह येणे अपेक्षित आहे. त्यासोबतच 2MP सेकंडरी कॅमेरा असेल. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा दिला जाऊ शकतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरीआहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :