जबरदस्त कॅमेरा फ्लॅश आणि बॅटरीसह Vivo V25 Pro आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Updated on 17-Aug-2022
HIGHLIGHTS

Vivo V25 Pro आज भारतात होणार लाँच

नवीन स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता लाँच होणार

लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या यु ट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम होईल

Vivo आज 17 ऑगस्ट रोजी आपली जबरदस्त स्मार्टफोन सिरीज Vivo V25 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. Vivo या सिरीजअंतर्गत Vivo V25e, V25 आणि V25 Pro सह अनेक डिवाइस देऊ शकतात. Vivo V25 सिरीज आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. कंपनी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाँच लाइव्ह-स्ट्रीम करणार आहे. जाणून घेऊयात फोनचे संभावित फीचर्स आणि किंमत… 

हे सुद्धा वाचा : खुशखबर ! 12GB रॅम आणि OnePlus चे सुपर फीचर्स असलेला फोन 5000 रुपयांनी स्वस्त, वाचा डिटेल्स

Vivo V25 Pro चे संभावित स्पेसिफिकेशन्स

Vivo V25 Pro मध्ये OnePlus Nord 2T, Oppo Reno8 5G आणि इतर फोन्स प्रमाणेच MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर समर्थित असेल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येईल. हे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट आणि व्लॉग मोड, हायब्रिड इमेज स्टॅबिलायझेशनसह 64MP मेन कॅमेरासह येईल. फोनमध्ये 66W फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4830mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, फोन 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह येईल आणि फोनमध्ये 8GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम असू शकते. 

Vivo V25 Pro ची अपेक्षित किंमत

Vivo V25 Pro भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज असेल. बेस मॉडेलची किंमत 39,999 रुपये असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, 12GB + 256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 43,999 रुपये असेल. विवो हा फोन सेलिंग ब्लू आणि प्युअर ब्लॅक कलरमध्ये लाँच करेल. विशेष म्हणजे फोनचा बॅक कलर चेंजिंग फीचरसह येईल.

आगामी Vivo फोन Flipkart, Vivo e-shop आणि Vivo stores वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. लीक झालेली किंमत खरी असल्यास, V25 Pro फोन OnePlus 10R आणि Realme GT Neo 3 ला जबरदस्त स्पर्धा देणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेले दोन्ही फोन 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :