Vivo T1x स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, जाणून संभाव्य किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Updated on 16-Jul-2022
HIGHLIGHTS

Vivo T1x स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच

5G व्हेरिएंटमध्ये 5,000m Ah बॅटरी 44W जलद चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध

फोनच्या 4G व्हेरिएंटमध्ये 5,000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग

चिनी मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आपला नवीन Vivo T1x स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्याची घोषणा केली आहे. Vivo च्या मते, हा फोन भारतात 20 जुलै रोजी लाँच होईल. हा फोन देशांतर्गत बाजारात 4G आणि 5G या दोन व्हेरियंटमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. भारतात हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह येईल. Vivo T1x मध्ये MediaTek Dimensity 900 प्रोसेसर उपलब्ध असेल. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.

हे सुद्धा वाचा : BSNL ची सर्वात मोठी ऑफर, 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग 7,97 रुपयांमध्ये एका वर्षासाठी उपलब्ध

Vivo T1x ची अपेक्षित किंमत

6 GB रॅम सह Vivo T1x 5G चे 128 GB स्टोरेज व्हेरिएंट चीनमध्ये 1,699 युआन म्हणजेच 19,900 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले होते. Vivo T1x 4G मलेशियामध्ये लाँच करण्यात आला असताना भारतातही ही किंमत समान राहण्याची अपेक्षा आहे. त्याचा 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 649 युआन म्हणजेच सुमारे 11,400 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला.

Vivo T1x चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Vivo T1x 1,080×2,408 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.58-इंच फुल HD+ डिस्प्ले दाखवते. या फोनमध्ये MediaTek Dimension 900 प्रोसेसरची पॉवर उपलब्ध आहे. Vivo T1x मध्ये सिक्युरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. Vivo T1x ला 256 GB पर्यंत ऑन-बोर्ड स्टोरेज मिळेल. या फोनच्या 4G व्हेरिएंटमध्ये 6.58-इंच लांबीचा फुल HD + LCD डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर होता.

Vivo T1x मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, त्याचा प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सेल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, या फोनमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे. Vivo T1x च्या 4G व्हेरिएंटमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे.

Vivo T1x च्या 5G व्हेरिएंटमध्ये 5,000m Ah बॅटरी आहे, जी 44W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, या फोनच्या 4G व्हेरिएंटमध्ये 5,000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. Vivo T1x च्या 5G व्हेरिएंटमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट देखील मिळेल.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :