BSNL ची सर्वात मोठी ऑफर, 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग 7,97 रुपयांमध्ये एका वर्षासाठी उपलब्ध

BSNL ची सर्वात मोठी ऑफर, 2 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग 7,97 रुपयांमध्ये एका वर्षासाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

वर्षभराच्या वैधतेसह BSNL चा सर्वोत्तम प्लॅन

प्लॅनची किंमत फक्त 797 रुपये

कॉलिंग, दररोज 2 GB डेटा इतर फायदे उपलब्ध

भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करण्याच्या बाबतीत Airtel  आणि रिलायन्स Jio च्याही पुढे आहे. BSNL चा स्वस्त प्लॅन यूजर्सना खूप आवडतो. जर तुम्हालाही BSNL च्या या स्वस्त प्लॅनची ​​माहिती हवी असेल आणि महागड्या रिचार्ज प्लॅनचा त्रास दूर करून पैसे वाचवण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी BSNL च्या सर्वोत्तम प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत. जे इतरांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. चला तर जाणून घेऊयात प्लॅनबाबत सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : अप्रतिम युक्ती ! मोबाईलच्या बॅकग्राउंडमध्ये 'अशा'प्रकारे YOU TUBE वरून गाणी ऐका, जाणून घ्या कसे ? 

797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन

BSNL कडून येणाऱ्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 797 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर दररोज 2 GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो. या योजनेची वैधता पूर्ण वर्षासाठी आहे. म्हणजेच तुम्हाला 365 दिवसांसाठी दररोज 2 GB इंटरनेट डेटा मिळेल.

 या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100SMS देखील मिळतात. दररोज उपलब्ध असलेला 2 GB डेटा संपल्यानंतरही, तुम्हाला 80Kbps च्या वेगाने मोफत डेटा मिळतो. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे विनामूल्य फायदे फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी वैध आहेत.

अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळेल

797 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही लोकल, STD  आणि रोमिंग कॉल देखील करू शकता. तुम्ही BSNL टू BSNL सह इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करू शकता.

 या संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांसाठी एकूण 730 GB डेटा, प्रतिदिन 100 SMS आणि अमर्यादित कॉलिंग मिळत आहे. जे इतर कोणत्याही कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनपेक्षा जवळपास 4 पट स्वस्त आहे. जर तुम्ही जास्त डेटा वापरत असाल तर BSNL चा हा 797 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo