Valentine Day 2025: प्रेमाच्या दिवसानिमित्त फ्लिप Smartphones वर मिळतोय भारी Discount, पहा डील्स

Updated on 06-Feb-2025
HIGHLIGHTS

Amazon India वर व्हॅलेंटाईन डे 2025 निमित्त फ्लिप स्मार्टफोन्सवर बेस्ट डील्स उपलब्ध आहेत.

Samsung चे फ्लिप फोन टेक विश्वात सर्वात महागडे फ्लिप फोन्स म्हणून प्रसिद्ध आहेत.

TECNO कडे अगदी स्वस्त फ्लिप स्मार्टफोन उपलब्ध आहे.

Valentine Day 2025: उद्या 7 फेब्रुवारी 2025 पासून अखेर व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच आठवड्याला सुरुवात होणार आहे. सध्या जिकडे तिकडे व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रेममय वातावरण झाले आहे. या दिवशी तुम्हाला आपल्या जोडीदाराला स्मार्टफोन गिफ्ट करून तुमचे प्रेम व्यक्त करता येईल. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon India वर व्हॅलेंटाईन डे 2025 निमित्त फ्लिप स्मार्टफोन्सवर बेस्ट डील्स उपलब्ध आहेत. तुम्हाला हे महागडे स्मार्टफोन अगदी वाजवी दरात मिळतील. आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम डील्सची यादी तयार केली आहे. पाहुयात यादी-

Also Read: आगामी Vivo V50 च्या लाँचपूर्वी Vivo V40 5G वर मिळतोय जबरदस्त Discount, ऑफर चुकवू नका

Samsung Galaxy Z Flip5

Samsung चे फ्लिप फोन टेक विश्वात सर्वात महागडे फ्लिप फोन्स म्हणून प्रसिद्ध आहेत. Samsung Galaxy Z Flip5 फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 59,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही हा फोन 2,901 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता. या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा प्रायमरी आणि 3.4-इंच लांबीचा सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 12+12 MP चा रियर कॅमेरा आणि 10MP चा फ्रंट कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

TECNO Phantom V Flip 5G

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता TECNO कडे अगदी स्वस्त फ्लिप स्मार्टफोन आहे. Tecno Phantom V Flip 5G फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 25,999 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 1260 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर खरेदी करू शकता. या फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा प्रायमरी आणि 1.32 इंच लांबीचा सेकंडरी डिस्प्ले आहे. याशिवाय, फोनमध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर आहे. यामध्ये तुम्हाला 64MP रियर आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Motorola razr 50

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola ने Motorola razr 50 फोनचा 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 54,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा फोन 2,666 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.9 इंच लांबीचा प्रायमरी आणि 3.6 इंच लांबीचा सेकंडरी डिस्प्ले आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :