आगामी Vivo V50 च्या लाँचपूर्वी Vivo V40 5G वर मिळतोय जबरदस्त Discount, ऑफर चुकवू नका

HIGHLIGHTS

Vivo V50 5G येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात दाखल होणार

आगामी फोन लाँच होण्यापूर्वी कंपनी त्यांच्या 'V' सिरीजमधील Vivo V40 5G फोनवर सवलत देत आहे.

Vivo V40 5G फोनमध्ये तुम्हाला 50MP सेल्फी कॅमेरा मिळेल.

आगामी Vivo V50 च्या लाँचपूर्वी Vivo V40 5G वर मिळतोय जबरदस्त Discount, ऑफर चुकवू नका

आगामी Vivo फोन म्हणजेच Vivo V50 5G येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात दाखल होणार आहे. हा मोबाईल फोन भारतीय बाजारात फेब्रुवारीच्या मध्यात लाँच होईल, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, आगामी स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी कंपनी त्यांच्या ‘V’ सिरीजमधील Vivo V40 5G फोनवर सवलत देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 8GB रॅम आणि 50MP सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन Flipkart द्वारे उत्तम डिस्काउंटसह खरेदी करता येईल. Vivo V40 ची किंमत आणि उपलब्ध ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Tech Tips: फक्त एका क्लिकसह स्किप करा मोठी ‘सायबर फ्रॉडपासून सावधान’ Caller Tune, जाणून घ्या कसे?

Vivo V40 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V40 5G फोनचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 39,999 रुपये इतकी आहे. मात्र, सध्या Flipkart वर हा फोन 5000 रुपयांच्या सवलतीसह केवळ 34,999 रुपयांपर्यंत सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डवरून EMI नसलेल्या व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Ganges Blue, Lotus Purple आणि Titanium Grey कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.

Vivo V40 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo V40 5G फोनमध्ये 2800 × 1260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंच लांबीचा 1.5K पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही एक 3D कर्व स्क्रीन आहे जी AMOLED पॅनेलवर बनवली आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येते. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB एक्सटेंडेड रॅम तंत्रज्ञान आहे, जे फोनच्या 8GB फिजिकल रॅमसोबत एकत्रित होऊन फोनला 20GB रॅमची पॉवर देते.

Vivo V40 5G

Vivo V40 फोनमध्ये ZEISS लेन्स वापरण्यात आला आहे, जो मागील आणि पुढील दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये आहे. ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आणि 50MP चा अल्ट्रा अँगल लेन्स समाविष्ट आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 50MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. मिड बजेटमध्ये सादर करण्यात आलेला हा उत्तम स्मार्टफोन आहे.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo