Upcoming Smartphones This Week: एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा देखील सुरु झाला आहे. या महिन्याच्या अखेर अनेक भारी स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. संपूर्ण एप्रिल महिन्यात अनेक उत्तम स्मार्टफोन्स भारतात सादर करण्यात आले आहेत. संपूर्ण महिन्याप्रमाणे एप्रिलचा शेवटचा आठवडा देखील स्मार्टफोन लाँचसाठी खास असणार आहे. येत्या आठवड्यात, दोन आघाडीचे स्मार्टफोन उत्पादक ब्रँड त्यांचे नवीनतम स्मार्टफोन भारतात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Also Read: Motorola Edge 60 Pro फोनची लाँच डेट जाहीर! जबरदस्त फीचर्ससह होणार भारतात दाखल
आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन ब्रँड म्हणजे Nothing चा सब-ब्रँड CMF आणि Motorola होत. लक्षात घ्या की, CMF Phone 1 चे अपग्रेडेड व्हर्जन, CMF Phone 2 Pro या आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. यासोबतच, आगामी Motorola Edge 60 Pro ची लाँच तारीखही उघड झाली आहे. पहा यादी-
आगामी CMF Phone 2 Pro भारतात 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 वाजता लाँच होणार आहे. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने लाँच होण्यापूर्वीच फोनच्या अनेक महत्त्वाच्या फीचर्सचा खुलासा करण्यास सुरुवात केली आहे. होय, स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रो प्रोसेसरने सुसज्ज असेल.
एवढेच नाही तर, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो सेन्सर आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. कंपनी हा फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच करू शकते.
Motorola Edge 60 Pro फोनची भारतीय लाँच तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. हा फोन भारतात 30 एप्रिल रोजी लाँच होईल. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील उपलब्ध असेल. लाँचिंगपूर्वी या फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी देखील करण्यात आली आहे. या फोनमध्ये 1.5K क्वाड कर्व्ड डिस्प्ले असेल. तसेच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि तिसरा 50MP कॅमेरा असेल.
एवढेच नाही तर, पॉवर बॅकअपसाठी, या फोनची बॅटरी 6000mAh इतकी असेल. लक्षात घ्या की, हा फोन स्पार्कलिंग ग्रेप आणि डॅझलिंग ब्लू कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाऊ शकतो. मात्र, वरील दोन्ही फोनची किंमत, सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स हे स्मार्टफोन्स लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.