Upcoming smartphones in March 2025: 2025 वर्षाचा तिसरा महिना म्हणजेच मार्च महिना सुरू झाला आहे. या वर्षीच्या सुरुवातीपासूनच अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या महिन्यात अनेक पॉवरफुल स्मार्टफोन लाँच होणार आहेत. या महिन्यात, भारतात एक नाही… दोन नाही… तर अनेक स्मार्टफोन लाँच केले जातील. आजपासून MWC देखील सुरु होत आहे, त्यामध्ये देखील अनेक उत्तम स्मटफोन्स लाँच केले जातील. या महिन्यात अनेक प्रसिद्ध ब्रँड Nothing, Vivo इ. चे नवे फोन्स भारतात लाँच केले जातील. पहा यादी-
Also Read: Nothing Phone 3a आणि 3a Pro लवकरच भारतात होणार लाँच, आताच प्लॅन करा बजेट! पहा अपेक्षित किंमत
Poco M7 5G फोन भारतात 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. या फोनची विक्री इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart द्वारे केली जाईल. फ्लिपकार्ट लिस्टिंगद्वारे फोनच्या किंमत श्रेणीची माहिती देखील उघड झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनची किंमत भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 प्रोसेसर असेल. या फोनमध्ये 6.88 इंच लांबीचा डिस्प्ले असेल. फोटोग्राफीसाठी 50MP कॅमेरा दिला जाईल. मात्र, फोनची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँचनंतरच उघड होतील.
Nothing Phone (3a) सिरीज भारतात उद्या म्हणजेच 4 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता लाँच होईल. या सिरीजअंतर्गत कंपनी नथिंग फोन (3a) आणि नथिंग फोन (3a) प्रो लाँच करू शकते. लीकनुसार, हे दोन्ही फोन उत्तम परफॉर्मन्ससाठी हे फोन्स स्नॅपड्रॅगन 7S Gen 3 प्रोसेसरसह येऊ शकतात. तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेल. मात्र, फोनची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँचनंतरच उघड होतील.
Vivo T4x फोन भारतात येत्या 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर देखील उपलब्ध असेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 सह येऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 6500mAh असेल, ज्यासोबत 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. फोनची खरी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लाँचनंतरच उघड होतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने iQOO Neo 10R फोन येत्या 11 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वर उपलब्ध असेल. स्पीड आणि मल्टीटास्किंग, हा फोन स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असेल. सध्या कंपनीने फोनशी संबंधित अनेक तपशील उघड केलेले नाहीत. मात्र, हा कंपनीचा सर्वात पॉवरफुल गेमिंग फोन असणार आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स उघड होतील.