Realme P3 Ultra Launch: मोठ्या बॅटरीसह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार भारी फोन, किती असेल किंमत?

Updated on 10-Mar-2025
HIGHLIGHTS

Realme च्या आगामी Realme P3 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा सुरु आहे.

अखेर Realme P3 Ultra फोनची भारतीय लाँच तारीख निश्चित झाली आहे.

जाणून घेऊयात या फोनची अपेक्षित किंमत आणि कन्फर्म तपशील

Realme P3 Ultra Launch: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme च्या आगामी Realme P3 Ultra स्मार्टफोनच्या लाँचची चर्चा सुरु आहे. अखेर या फोनची भारतीय लाँच तारीख निश्चित झाली आहे. हा फोन कंपनीच्या Realme P3 सिरीजमधील नवीनतम आवृत्ती असणार आहे. या फोनसोबतच कंपनी Realme P3 5G फोन देखील लाँच करू शकते. या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी उपलब्ध असणार आहे. यासह फोनचे काही फीचर्स देखील कन्फर्म झाले आहेत. तसेच, अपेक्षित किंमत देखील पुढे आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Realme P3 Ultra चे भारतीय लॉन्चिंग तपशील-

Also Read: अबब! Samsung च्या फ्लॅगशिप फोनवर तब्बल 40,000 रुपये Discount, ही ऑफर नंतर कधीच मिळणार नाही

Realme P3 Ultra चे भारतीय लाँच

Realme कंपनीने त्यांच्या अधिकृत X हँडलद्वारे Realme P3 Ultra स्मार्टफोनच्या भारतात लाँच तारखेची पुष्टी केली आहे. त्यानुसार, हा फोन येत्या 19 मार्च रोजी भारतात लाँच केला जाईल. वर सांगितल्याप्रमाणे, यासह Realme P3 5G फोन देखील भारतात लाँच केला जाईल. या फोनची विक्री प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे उपलब्ध असेल. तर, लाँच होण्यापूर्वी यावर फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी देखील करण्यात आली आहे.

लीकनुसार, या फोनचे अपेक्षित किंमत देखील पुढे आली आहे. कंपनी हा स्मार्टफोन सुमारे 30,000 रुपयांना लाँच करू शकते. येत्या काही दिवसांत, कंपनी फोनच्या डिझाइनचेही अनावरण करणार आहे. मात्र, फोनची खरी किंमत हा फोन लाँच झाल्यावरच पुढे येईल.

Realme P3 Ultra चे फीचर्स आणि स्पेक्स

कन्फर्म फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्पीड आणि मल्टीटास्किंग, हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देखील मिळेल. विशेष म्हणजे दीर्घ गेमिंग सत्रांमध्ये हा फोन थंड ठेवण्यासाठी यात पॉवरफुल VC कूलिंग सिस्टमने देखील असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6000mAh जंबो बॅटरी उपलब्ध असेल, ज्यामध्ये 80W AI बायपास फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.

महत्त्वाचे लक्षात घ्या की, AI बायपास बॅटरी गरम होण्यापासून रोखते. हे विशेषतः सुपर-फास्ट चार्जिंग असलेल्या हाय-एंड स्मार्टफोनवर असते. आणि परिणामी ते दीर्घकाळ गेमिंग सत्रादरम्यान फोनला थंड राहण्यास देखील मदत करते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :