अबब! Samsung च्या फ्लॅगशिप फोनवर तब्बल 40,000 रुपये Discount, ही ऑफर नंतर कधीच मिळणार नाही
Samsung Galaxy S25 सिरीज लाँच झाल्यानंतर जुने मॉडेल्स स्वस्त
Samsung Galaxy S24+ फ्लॅगशिप फोनवर होईल हजारो रुपयांची बचत
या फोनमध्ये तुम्हाला अनेक गॅलेक्सी AI फीचर मिळतील.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक कंपनी Samsung ने अलीकडेच आपली लेटेस्ट फ्लॅगशिप नंबर सिरीज म्हणजेच Samsung Galaxy S25 मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही सिरीज लाँच झाल्यानंतर कंपनी जुन्या मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सवलती ऑफर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon वर Samsung Galaxy S24 आणि S24+ वर मोठ्या सवलती मिळत आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S24+ वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. यासह, तुम्ही या फोनवर हजारो रुपयांची बचत करू शकता. जाणून घेऊयात ऑफर्स-
SurveyAlso Read: तुमच्या बायकोच्या हातात शोभून दिसेल, 50MP सेल्फी कॅमेरासह येणारा Vivo फोन, Best ऑफर्स उपलब्ध

Samsung Galaxy S24+ ची किंमत
Samsung Galaxy S24+ फोन Amazon वर 59,620 रुपयांना खरेदीसाठी सूचिबद्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन त्याच्या लाँच किमतीपेक्षा 40,000 रुपये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लक्षात घ्या की, लाँचच्या वेळी या फोनची किंमत 99,999 रुपयांपर्यंत होती. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर नो कॉस्ट EMI, कॅशबॅक इ. ऑफर्स मिळणार आहेत. तर, फोनचा EMI 2,890 रुपयांना उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy S24+ चे तपशील
या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा हाय डेफिनेशन प्लस डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. स्पीड, मल्टीटास्किंग आणि स्मूथ परफॉर्मन्ससाठी, हा फोन Exynos 2400 चिपसेटवर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB रॅम आणि 256GB किंवा 512GB इंटरनल स्टोरेजचा पर्याय आहे. हा फोन IP68 रेटिंगसह येतो. लक्षात घ्या की, या फोनमध्ये तुम्हाला अनेक गॅलेक्सी AI फीचर मिळतील.
यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा आहे. ज्यामध्ये 10MP आणि 12MP चे आणखी दोन मागील कॅमेरे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 12MP चा कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 6.1 वर चालतो. पॉवर बॅकअपसाठी, 4900mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी हा फोन 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile