प्रसिद्ध संर्टफोन निर्माता Oppo ने Oppo K13 5G स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट निश्चित झाली आहे. हा कंपनीचा नवीनतम मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. या फोनची विक्री इ-कॉमर्स साईट Flipkart वर उपलब्ध असेल. एवढेच नाही तर, या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart साइटवर लाईव्ह झाली आहे. या साईटद्वारे फोनच्या अनेक फीचर्सची पुष्टी करण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. चला तर मग जाणून घेऊयात Oppo K13 5G चे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Vivo च्या आगामी फोनची भारतीय लाँच डेट Confirm! मोठी बॅटरी आणि खास तरुणांसाठी AI फीचर्ससह डिझाईन
Oppo ने Oppo K13 5G फोनच्या भारतीय लाँच तारखेची पुष्टी केली आहे. हा फोन 21 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. वर सांगितल्याप्रमाणे, या फोनसाठी समर्पित मायक्रोसाइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. या साईटद्वारे फोनचे अनेक फीचर्स उघड झाले आहेत.
Oppo K13 5G फोनचे अपेक्षित तपशील पुढे आले आहेत. लीकनुसार, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले दिला जाईल. त्याबरोबरच, या डिस्प्लेमध्ये 1200 निट्स पर्यंत ब्राइटनेस उपलब्ध असेल. प्रोटेक्शनसाठी, या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen प्रोसेसरने सुसज्ज असेल. तसेच, यासह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असेल.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP AI कॅमेरा असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये तब्बल 7000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. हा फोन 30 मिनिटांत 62% पर्यंत चार्ज होईल, असा कंपनीचा दावा आहे. हा फोन आइसी पर्पल आणि प्रिझम ब्लॅक करत ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. कंपनी या फोनमध्ये स्प्लॅश टचसाठी देखील सपोर्ट देणार आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, वरील सर्व माहिती फोनची लीक झालेली माहिती आहे, कन्फर्म फीचर्स फोन लाँच झाल्यानंतरची पुढे येतील.