Motorola Edge 60 Stylus
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Motorola चा नवा Motorola Edge 60 Stylus फोन भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. 2024 मध्ये Moto G Stylus (2024) लाँच केल्यानंतर कंपनी स्टायलस सपोर्ट असलेला दुसरा फोन आणत आहे. Motorola ने अद्याप या फोनची लाँच तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, लीक अहवालांमधून फोनबद्दल बरेच काही उघड झाले आहे. एवढेच नाही तर, फोनची किंमत देखील लीक झाली आहे. जाणून घेऊयात Motorola Edge 60 Stylus चे सर्व तपशील-
Also Read: Llyod ने लाँच केले नवीन AC! अवघ्या काही सेकंदातच तुमचे रूम होईल थंड, जाणून घ्या किंमत
प्रसिद्ध टिपस्टरच्या लीकनुसार, Motorola Edge 60 Stylus स्मार्टफोन 17 एप्रिल 2025 रोजी भारतात लाँच होऊ शकतो. वर सांगितल्याप्रमाणे, फोनची किमत देखील लीक झाली आहे, जी 22,999 रुपये असू शकते. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, आतापर्यंत कंपनीने लाँचिंग तारीख आणि किंमतीशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही.
लोकप्रिय टिपस्टर्स इव्हान ब्लास म्हणजेच @evleaks आणि अभिषेक यादव म्हणजेच @yabhishekhd ने Motorola च्या आगामी स्मार्टफोनचे रेंडर शेअर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन पर्पल आणि डार्क ब्लू या दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. या फोनची डिझाईन देखील मोटो जी स्टायलस (2024) सारखीच आहे. फोनमध्ये व्हेगन लेदर बॅक पॅनल आणि होल-पंच डिस्प्ले आहे.
लीक अहवालानुसार, आगामी फोनमधील विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन वॉटर रेझिस्टन्सला देखील सपोर्ट करू शकतो. या स्टायलसमध्ये डूडलिंग आणि स्क्रिबलिंगची फीचर्स देखील असू शकतात. जे ड्रॉईंग, स्केचिंग, नोट्स घेणे आणि बरेच काही करण्यास मदत करतील. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनच्या पुढील बाजूस 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.