Llyod ने लाँच केले नवीन AC! अवघ्या काही सेकंदातच तुमचे रूम होईल थंड, जाणून घ्या किंमत
भारतात एअर कंडिशनर खरेदी करण्यासाठी Llyod कंपनी लोकप्रिय आहे.
Llyod ने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच केले.
Llyod ने स्टेलर, स्टायलस आणि मास्टरपीस सिरीजअंतर्गत नवीन एसी मॉडेल्स आणि StunnAir 6-in-1 एक्सपांडेबल AC लाँच केले.
प्रसिद्ध टेक कंपनी Llyod ने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने AC, रेफ्रिजरेटर्सची एक नवीन कॅटेगरी, मिनी LED टीव्ही आणि वॉशिंग मशीनची श्रेणी सादर केली आहे. भारतात एअर कंडिशनर खरेदी करण्यासाठी Llyod कंपनी लोकप्रिय आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी कंपनीने भारतात AC उत्पादनाचा विस्तार केला आहे. जाणून घेऊयात किंमत आणि सर्व तपशील-
SurveyLlyod ने स्टेलर, स्टायलस आणि मास्टरपीस सिरीजअंतर्गत नवीन एसी मॉडेल्स आणि StunnAir 6-in-1 एक्सपांडेबल AC लाँच केले आहेत.
Llyod StunnAir AC ची किंमत
Llyod ने 74,032 रुपयांना स्टनएअर स्प्लिट AC लाँच केला आहे. ही किंमत 1.5 टन क्षमतेच्या 5-स्टार व्हेरिएंटची आहे. त्याबरोबरच, Llyod च्या स्टेलर सिरीजची किंमत 66,991 रुपयांपासून सुरू होते. याव्यतिरिक्त, स्टायलस स्प्लिट AC ची किंमत 40,990 रुपयांपासून सुरू होते.

लक्षात घ्या की, ही किंमत 1 टन क्षमतेच्या 3 स्टार AC ची आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हे सर्व मॉडेल्स खरेदी करता येईल.
Llyod StunnAir AC
Llyod StunnAir AC अनेक आकर्षक आणि अनोख्या फीचर्ससह येतो. या AC मध्ये प्रगत AI फीचर्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या AC मध्ये ह्युमन डिटेक्शन फिचर देखील आहे, ज्यामुळे खोलीत मानव जाणवल्यानंतर AC रूम थंड करण्यास सुरुवात करेल. दुसरीकडे, या AC मध्ये 3D एअरफ्लो फीचर देखील उपलब्ध आहे. हा AC तब्बल 60 अंश सेल्सिअस पर्यंतच्या उष्णतेमध्ये सहज काम करेल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, हा AC फक्त 30 सेकंदात 18 अंश सेल्सिअस पर्यंत थंड होऊ शकतो, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, एअर कंडिशनरमध्ये व्हॉइस कमांड फीचर देखील उपलब्ध आहे. तसेच, इनडोअर युनिटमध्ये एम्बियंट लाइटिंग देण्यात आली आहे. या AC मध्ये इन-बिल्ट एअर प्युरिफायर देण्यात आला आहे. जर तुम्ही दीर्घकाळासाठी आपल्या बेडरूम, हॉल किंवा लिविंग रूमसाठी AC शोधात असाल तर, हा AC तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile