प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO India चे CEO निपुण मार्याने नुकतेच भारतीय बाजारात iQOO Neo 10R च्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. आगामी स्मार्टफोन मार्च महिन्याच्या सुरुवातीला लाँच केला जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतातील iQOO चा नवीन हँडसेट आहे, ज्याला चाहते पुढचा BGMI किंग देखील म्हणत आहेत. हा फोन 11 मार्च रोजी लाँच होणार आहे. लाँचची पुष्टी झाल्यानंतर, आगामी iQOO Neo 10R बद्दल अनेक लीक्स पुढे येत आहेत. फोनची अपेक्षित किंमत आणि महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच उघड झाले आहेत. पाहुयात सविस्तर तपशील-
iQOO Neo 10R च्या स्क्रीनचा आकार अधिकृतपणे जाहीर करण्यात आला नाही. परंतु, यात 1.5K AMOLED डिस्प्लेसह फोनमध्ये 6.78 इंच लांबीची स्क्रीन मिळू शकते. तसेच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 SoC असल्याची आधीच पुष्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा फोन 5 तासांपर्यंत स्थिर 90fps गेमिंग अनुभव आणि 2000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट देईल. तसेच, यात एक समर्पित ई-स्पोर्ट्स मोड देखील असेल, जो गेमिंगसाठी कामगिरी ऑप्टिमाइझ करेल, असे म्हटले जाते.
त्याबरोबरच, iQOO Neo 10R हा या सेगमेंटमधील सर्वात स्लिम फोन असेल, ज्याची जाडी फक्त 7.98mm असेल. तर, पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6400mAh बॅटरी मिळेल, जी 80W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येईल. तर, फोटोग्राफीसाठी 50MP 1/1.953-इंच Sony OIS कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स असण्याची पुष्टी झाली आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी 32MP फ्रंट सेन्सर असेल. हा फोन 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल. लक्षात घ्या की, iQOO Neo 10R रॅगिंग ब्लू आणि मूननाइट टायटॅनियम कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल, असे सांगितले गेले आहे.
iQOO Neo 10R ची नेमकी किंमत हा फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल. iQOO Neo 10R हा या सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन असल्याचे म्हटले जात आहे. या फोनची अपेक्षित किंमत सुमारे 30,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, ही देशातील फोनची सुरुवातीची किंमत असू शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, iQOO Neo 9 Pro गेल्या वर्षी 35,999 रुपयांना भारतात लाँच करण्यात आला होता.