सेल्फी लव्हर्स! 50MP फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या Vivo V30 Pro वर मिळतोय भारी Discount, स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी

HIGHLIGHTS

आकर्षक फीचर्स आणि अप्रतिम कॅमेरासह येणाऱ्या Vivo V30 Pro वर मोठ्या प्रमाणात सवलत

आकर्षक Vivo V30 Pro खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट

Vivo V30 Pro स्मार्टफोनमध्ये 50MP सेन्सर आणि 32MP सेल्फी कॅमेरा

सेल्फी लव्हर्स! 50MP फ्रंट कॅमेरासह येणाऱ्या Vivo V30 Pro वर मिळतोय भारी Discount, स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी

अप्रतिम आणि उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo च्या V सिरीजचे स्मार्टफोन्स लोकप्रिय आहेत. कंपनीचे V सिरीजचे स्मार्टफोन्स मिड बजेट रेंजमध्ये येतात. सध्या आकर्षक फीचर्स आणि अप्रतिम कॅमेरासह येणाऱ्या Vivo V30 Pro वर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. हा फोन कंपनीने जरा प्रीमियम बजेटमध्ये लाँच केला. फोनमध्ये 512GB स्टोरेज, 50MP फ्रंट कॅमेरा इ. पॉवरफूल फीचर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Vivo V30 Pro ची किंमत आणि फीचर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Vivo T4x इंडिया लाँच: 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरापासून किमतीपर्यंत जाणून घ्या सर्व काही, काय मिळेल विशेष?

Vivo V30 Pro किंमत आणि फीचर्स

क्रोमा वर Vivo V30 Pro फोनवर मोठ्या प्रमाणात सवलत उपलब्ध आहे. या फोनच्या 12GB+512GB स्टोरेज मॉडेलची किंमत 46,999 रुपये इतकी आहे. तर, 8GB+128GB स्टोरेज व्हेरिएंट 41,999 रुपयांना मिळतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, शॉपिंग वेबसाइट क्रोमावरून Vivo V30 Pro खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, हँडसेटवर दरमहा 1,977 रुपयांचा नो-कॉस्ट ईएमआय आणि 35,699 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

Vivo V30 Pro 5G camera phone

Vivo V30 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Vivo V30 Pro मध्ये 6.78-इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे, रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात अ‍ॅक्सेलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी आणि जायरोस्कोपसारखे सेन्सर्स आहेत. हा फोन अँड्रॉइड 14 वर आधारित Funtouch OS 14 वर कार्य करतो. सुरक्षेसाठी, हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. या फोनला पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.

Vivo V30 Pro स्मार्टफोनमध्ये OIS Sony IMX920 50MP सेन्सर, AF Sony IMX816 50MP पोर्ट्रेट लेन्स आणि 50MP AF वाइड अँगल लेन्स आहे. यामध्ये ड्युअल व्ह्यू, लाईव्ह फोटो आणि पोर्ट्रेट सारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo V30 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP कॅमेरा आहे. यात हाय-रिझोल्यूशन, अल्ट्रा एचडी, स्लो-मोशन, टाइम-लॅप्स, सुपरमून आणि स्पोर्ट्स सारखे कॅमेरा स्पेसिफिकेशन आहेत. पॉवर बॅकअपसाठी 5000mah बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo