4 GB रॅमसह बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनची पहिली विक्री आज , किंमत 9 हजार रुपयांपेक्षाही कमी

4 GB रॅमसह बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनची पहिली विक्री आज , किंमत 9 हजार रुपयांपेक्षाही कमी
HIGHLIGHTS

Infinix Hot 12 Play बजेट स्मार्टफोनची पहिली विक्री आज

हा फोन विक्रीसाठी ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkartवर उपलब्ध

Infinix Hot 12 Play ची किंमत 8,499 रुपये

आजकाल उत्तम प्रतीचे आणि दर्जेदार स्मार्टफोन हवे असल्यास आपल्याला कमीत-कमी 25 ते 30 हजार रुपये खर्च करावे लागतात. अशातच बऱ्याच टेक कंपन्या आता उत्तम प्रतीचे आणि दर्जेदार फोन ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत लाँच करताना दिसत आहेत. नुकताच लाँच केलेला बजेट स्मार्टफोन Infinix Hot 12 Play 30 मे 2022पासून विक्रीसाठी जात आहे. 8,499 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. कंपनीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "डान्स करा, गाणे म्हणा, सेलिब्रेट करा – Infinix Hot 12 Play विक्रीसाठी उपलब्ध असेल! सेगमेंट फर्स्ट फीचर्ससह हा स्मार्टफोन 8,499 रुपयांमध्ये उपलब्ध असेल."

Infinix Hot 12 Play ड्युअल रियर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. Infinix Hot 12 Playमध्ये Unisoc T610 प्रोसेसरसह 64 GB स्टोरेज मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमही उपलब्ध आहे. चला तर बघुयात नवीन स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…  

Infinix Hot 12 Playची किंमत: 

Infinix Hot 12 Play ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 4 GB रॅम सह 64 GB स्टोरेज वेरीएंटची आहे. स्मार्टफोन सॅम्पेन गोल्ड, डेलाइट ग्रीन, हॉरीझन ब्लू आणि रेसिंग ब्लॅक या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. Infinix च्या या फोनची विक्री 30 मे 2022 म्हणजेच आजपासून Flipkart या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. 

Infinix Hot 12 Play चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 12 Playमध्ये  Android 11 सह XOS 10 मिळेल. यात 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.82-इंच लांबीचा  फुल HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 480 निट्स आहे. फोनमध्ये UniSoc T610 प्रोसेसर आहे जो ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. यात 4 GB रॅमसह 3 GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल.  त्याबरोबरच या फोनमध्ये 64 GB स्टोरेज आहे.

Infinix Hot 12 Play मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 13 मेगापिक्सेल आहे. त्यासोबतच क्वाड फ्लॅश लाईट देखील आहे. आकर्षक सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी Infinix Hot 12 Play मध्ये 4G LTE, WCDMA, GSM, Wi-Fi 02.11 a/b/g/n, Bluetooth v5 आणि GPS/ A-GPS आणि फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे.  Infinix Hot 12 Play गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झालेल्या Infinix Hot 11 Play ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. 

Infinix Hot 11 Playचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 11 Play मध्ये 6.82 इंच लांबीचा HD + IPS डिस्प्ले आहे आणि MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये सिंगल 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये 6,000 mAh ची बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी Infinix Hot 11 Play मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आहे जो AI लेन्ससह येतो. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo