पावरफुल फीचर्ससह TECNOचा नवा फोन भारतात लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये येणार किंमत

Updated on 24-Mar-2023
HIGHLIGHTS

Tecno Spark 10 Pro बजेट स्मार्टफोन भारतात लाँच

नव्या फोनची किंमत 12,499 रुपये

फोन भारतात 24 मार्चपासून सर्व भागीदार स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Tecno ने गुरुवारी भारतात आपला नवीन परवडणारा फोन Tecno Spark 10 Pro लाँच केला आहे. Tecno Spark 10 Pro या वर्षी फेब्रुवारीमध्ये MWC 2023 मध्ये सादर करण्यात आला होता. हा फोन भारतात MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि इतर फीचर्स – 

हे सुद्धा वाचा : Vodafone-Idea ग्राहकांसाठी मोठा निर्णय, कंपनीने सिम कार्डसाठी केली महत्वाची घोषणा

Tecno Spark 10 Pro किंमत

टेक्नोचा नवा फोन एंट्री लेव्हल स्मार्टफोन म्हणून सादर करण्यात आला आहे. फोनच्या 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये आहे.फोन लुनार एक्लीप्स, पर्ल व्हाइट आणि स्टाररी ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. हा फोन भारतात 24 मार्चपासून सर्व भागीदार स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Tecno Spark 10 Pro

Tecno Spark 10 Pro ला Android 13 आधारित HiOS 12.6 आउट-ऑफ-द-बॉक्स मिळतो. फोनमध्ये 6.8-इंच लांबीचा फुल HD प्लस LCD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 270Hz टच सॅम्पलिंग रेट आणि (2460 x 1080 पिक्सेल) सह येतो. फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरसह 8 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि 8 GB पर्यंत LPDDR5 रॅमसाठी समर्थन आहे. फोनमध्ये UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेज 128GB पर्यंत उपलब्ध आहे.

याशिवाय, फोनवरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, एक 3.5 मिमी ऑडिओ जॅक आणि चार्जिंगसाठी USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Tecno Spark 10 Pro सह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर उपलब्ध आहे. फोनसोबत मागील कॅमेरासोबत LED फ्लॅशही उपलब्ध आहे. इतर दोन कॅमेऱ्यांना वाइड अँगल आणि मॅक्रो लेन्स मिळतात. समोर, फोनमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशलाइटसह 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :