samsung 5g phone get huge price cut in india
तुम्ही देखील Samsung स्मार्टफोन्सचे चाहते असाल तर, हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला स्वस्त 5G सॅमसंग फोन खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी ब्रँडचा Galaxy M34 5G हा सर्वोत्तम पर्याय बनू शकतो.. कंपनीने मोबाईलची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy M34 5G ची नवी किंमत-
Also Read: अनोख्या डिझाईनसह Nothing लवकरच भारतात सादर करेल नवा फोन, सर्वांच्या बजेटमध्ये असेल किंमत?
Samsung Galaxy M34 5G फोनचा 6GB रॅम व्हेरिएंट 16,999 रुपये आणि 8GB रॅम व्हेरिएंट 18,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने या दोन्ही मॉडेल्सच्या किमतीत 4 हजार रुपयांची कपात केली आहे. या मोठ्या कपातीनंतर, Samsung Galaxy M34 5G चे 6GB मॉडेल आता केवळ 12,999 रुपयांना आणि 8GB रॅम व्हेरिएंट केवळ 14,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा फुल HD + वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. ही स्क्रीन सुपर AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी, फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह संरक्षित आहे. परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये ब्रँडचा Exynos 1280 octa-core प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. मागील कॅमेरा OIS तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 13MP सेल्फी सेन्सर देखील देण्यात आला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी मिळेल, जी 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.