6000mAh बॅटरीसह येणारा Samsung Galaxy M34 5G फोन 3000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

HIGHLIGHTS

Samsung Galaxy M34 5G फोनच्या किमतीत 3000 हजार रुपयांची कपात

Samsung Galaxy M34 5G फोन 6000mAh मोठ्या बॅटरीसह येतो.

अलीकडेच Samsung Galaxy a05s स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे.

6000mAh बॅटरीसह येणारा Samsung Galaxy M34 5G फोन 3000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

Samsung सध्या आपल्या उपकरणांच्या किमती स्वस्त करताना दिसत आहे. अलीकडेच Samsung Galaxy a05s स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे, अशी बातमी आली होती. त्यानंतर, Samsung Galaxy M34 5G फोनच्या किमतीत 3000 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. हा फोन 6000mAh मोठ्या बॅटरीसह येतो. कंपनीने हा फोन आता अधिक स्वस्त केला आहे. जाणून घेऊयात या फोनची नवीन किंमत आणि सर्व फीचर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Samsung Galaxy M34 5G ची नवी किंमत

पूर्वी Samsung Galaxy M34 5G फोनचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 20,999 रुपये होती. मात्र, ,Samsung Galaxy M34 5G च्या किमतीत कपात केल्यानंतर फोनचा 6GB रॅम मॉडेल 15,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, 8GB मॉडेल 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाले आहे.

Samsung Galaxy M34 5G
Samsung Galaxy M34 5G

Samsung Galaxy M34 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M34 5G फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि 8GB रॅम पर्याय आहेत, जे 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतात.

Samsung Galaxy M34 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 2MP तिसरा कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी यात मोठी 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile