Samsung Galaxy M16 आणि Galaxy M06 5G ची किंमत
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung च्या नव्या Galaxy M सिरीजच्या स्मार्टफोन लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर Samsung Galaxy M16 आणि Galaxy M06 5G स्मार्टफोन आज म्हणजेच 27 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात लाँच करण्यात आले आहेत. भारतीय बाजारात M सीरीजच्या अनेक स्मार्टफोन्सने आधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. आता कंपनीने आणखी दोन नवीन उपकरणे सादर केली आहेत. हे स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्ससह लाँच झाले आहेत. जाणून घेऊयात Samsung Galaxy M16 आणि Galaxy M06 5G ची किंमत आणि टॉप फीचर्स-
Also Read: Upcoming Samsung Phones: लोकप्रिय Galaxy A सिरीजमध्ये नवे स्मार्टफोन होणार दाखल, किती असेल किंमत?
Samsung Galaxy M16 5G फोन 11,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिएंटची ही किंमत आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 5 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. तर दुसरीकडे, सॅमसंग गॅलेक्सी M06 5G स्मार्टफोन 9,499 रुपयांच्या विशेष लाँच किमतीत लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट या किमतीत येईल. या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 7 मार्च 2025 पासून Amazon वर सुरू होईल.
Samsung Galaxy M16 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तर, Galaxy M06 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे.
Samsung Galaxy M16 5G फोनमध्ये डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Galaxy M06 5G स्मार्टफोनमध्ये हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 SoC ने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित वन यूआय 7.0 वर कार्य करतो.
Samsung Galaxy M16 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 50MP चा मेन, 5MP चा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP चा डेप्थ लेन्स आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 13MP कॅमेरा आहे. तर, दुसऱ्या Galaxy M06 5G स्मार्टफोनमध्ये दोन रियर कॅमेरा सेटअप आहेत. यात 50MP चा मुख्य आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आकर्षक सेल्फीसाठी यात 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
पॉवरसाठी, Samsung Galaxy M16 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. त्याबरोबरच, Galaxy M06 5G फोनमध्ये ऊर्जा देण्यासाठी 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय एसी, ब्लूटूथ 5.3, GPS आणि 3.5mm हेडफोन आहेत.