Upcoming Samsung Phones: लोकप्रिय Galaxy A सिरीजमध्ये नवे स्मार्टफोन होणार दाखल, किती असेल किंमत?
Samsung कंपनी लवकरच A सीरीजअंतर्गत आपले नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.
नवे फोन Samsung Galaxy A36 आणि Galaxy A56 फोन असू शकतात.
आगामी फोन्स तब्बल 6 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्ससह येतील.
Upcoming Samsung Phones: साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung कंपनी लवकरच A सीरीजअंतर्गत आपले नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही काळापूर्वी कंपनीने भारतात या सिरीजअंतर्गत Samsung Galaxy A06 5G बजेट स्मार्टफोन लाँच केला होता. मात्र आता या सिरीजअंतर्गत कंपनी एक मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे, जो मार्चमध्ये लाँच केला जाऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फोन Samsung Galaxy A36 आणि Galaxy A56 फोन असू शकतात. कंपनीने अलीकडेच फोनचा अधिकृत टीझर व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये फोनचा पहिला लूक दिसला. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात किंमत-
SurveySamsung ने स्वतः दिली माहिती
Samsung इंडियाने त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओमध्ये फोनचा फर्स्ट लूक पाहायला मिळणार आहे. तसेच, कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी A सिरीजच्या भारतीय लाँचची पुष्टी केली आहे. सध्या, कंपनी या सिरीजअंतर्गत कोणते डिव्हाइस लाँच करणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, आगमीओ फोन Samsung Galaxy A36 आणि Galaxy A56 असू शकतात, असे मानले जात आहे.
Awesome is evolving. Awesome is going beyond. Awesome is now smarter. Get ready for a new era. Coming soon. #AwesomeGalaxyA #Samsung pic.twitter.com/Pvn9Kyrw2v
— Samsung India (@SamsungIndia) February 24, 2025
Samsung ने शेअर केलेल्या टिझर व्हीडिओनुसार, Samsung India ने पुष्टी केली आहे की, हा पहिला A सिरीज फोन असेल, जो तब्बल 6 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स प्राप्त करेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापूर्वी कंपनी या फोनसोबत 4 वर्षांपर्यंत OS अपडेट देत असे.
Samsung Galaxy A36 बद्दल लीक्स
Samsung Galaxy A36 च्या लीक झालेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy A36 फोनमध्ये चांगल्या परफॉमरन्ससाठी स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर असू शकतो. यासोबतच, तुम्हाला 6GB रॅम मिळणार आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेकंडरी कॅमेरा आणि 5MP मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा उत्तम आहे.

Samsung Galaxy A56 बद्दल लीक्स
Samsung Galaxy A56 च्या लीक झालेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मूथ परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Exynos 1580 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनसह 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच, लीकनुसार फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. याव्यतिरिक्त, पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी वेब सर्फिंगसारख्या इतर मूलभूत कार्यांसह दोन दिवसांपर्यंत टिकू शकते, असे म्हटले जाते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile