भारतीय लाँचपूर्वीच Google Pixel 9a ची किंमत Leak! आकर्षक डिझाईन, कॅमेराकडे सर्वांचे लक्ष, आताच प्लॅन करा बजेट
Google Pixel 9a च्या लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे.
Google Pixel 9a च्या किमती संबंधित माहिती लीक झाली आहे.
Google Pixel 9a स्लीक, फ्लॅश-बॅक डिझाइन असू शकतो.
Google Pixel 9a च्या लाँचची चर्चा टेक विश्वात अनेक दिवसांपासून सुरु आहे. या फोनबद्दल माहिती बऱ्याच काळापासून ऑनलाईन पुढे येत आहे. दरम्यान, या फोनच्या किमतीबद्दल लीक पुढे आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या आगामी फोनच्या युरोपियन किंमती एका अहवालात उघड केले गेले आहेत. फोनची लाँचिंग तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र, हा गुगल फोन पिक्सेल 9 सिरीजमधील इतर फोनसोबत येऊ शकतो. या फोनची टक्कर थेट iPhone 16e सह येणार आहे. मात्र, दोन्ही फोनचे कार्य पूर्णपणे वेगळे आहे.
SurveyGoogle Pixel 9a ची किंमत Leak
भारतात Google Pixel 9a ची किंमत अद्याप जाहीर झालेली नसली तरी, पिक्सेल 8a च्या किमतीपेक्षा ती अधिक असण्याची शक्यता आहे. मागील अहवालांनुसार, Google Pixel 9a ची किंमत अमेरिकेत 128GB व्हेरिएंटसाठी $499 म्हणजेच अंदाजे 43,400 रुपये आणि 256GB मॉडेलसाठी $599 म्हणजेच अंदाजे 51,800 रुपये असेल. तर, बेस मॉडेलची किंमत Pixel 8a सारखीच असणार आहे, परंतु जास्त स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत $40 म्हणेजच अंदाजे 3,400 रुपयांनी वाढू शकते.

अशा परिस्थितीत, पिक्सेल 9a ची सुरुवातीची किंमत 52,999 रुपये असू शकते, तर 256GB मॉडेलची किंमत 64,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. लक्षात घ्या की, यामुळे दोन्ही स्टोरेज पर्यायांमध्ये 10,000 रुपयांपेक्षा जास्त फरक पडू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Pixel 8a भारतात 128GB व्हेरिएंटमध्ये 52,999 रुपयांना आणि 256GB व्हेरिएंटमध्ये 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
Google Pixel 9a चे अपेक्षित तपशील
लीकनुसार, Google Pixel 9a मध्ये स्लीक, फ्लॅश-बॅक डिझाइन असू शकतो. जे मागील पिक्सेल मॉडेल्समध्ये असलेल्या सिग्नेचर बार-स्टाईल कॅमेरा मॉड्यूलपेक्षा वेगळा असेल. पुढे आलेल्या व्हिडिओमध्ये फोनचा रियर भाग दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये मध्यभागी गुगलचा लोगो असलेला फ्लॅट, मॅट फिनिश आहे. त्याच्या मागील मॉडेल्सपेक्षा वेगळे कॅमेरा मॉड्यूल बॉडीमध्ये कॉम्पॅक्टली इंटिग्रेटेड आहे. डिव्हाइसच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर आहे.
कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, Pixel 9a मध्ये ड्युअल-लेन्स सेटअप उपलब्ध आहे. यात 48MP चा प्रायमरी सेन्सर आणि 13MP चा अल्ट्रा-वाइड लेन्स असू शकतो. तसेच, यात फ्रंट-फेसिंग कॅमेरा 13MP चा असू शकतो. मात्र, फोनची खरी किंमत, इतर सर्व फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स Google Pixel 9a लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile