Samsung Galaxy F16 5G
Samsung Galaxy F16 5G: Samsung ने नुकतेच म्हणजेच काल 12 मार्च 2025 रोजी आपला नवीन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy F16 5G लाँच केला आहे. हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन आहे, जो अलीकडेच F-सिरीजमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री आज म्हणजेच 13 मार्च 2025 रोजी सुरु झाली आहे. ही सेल दुपारी 12 वाजल्यापासून प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट Flipkart वर लाईव्ह झाली आहे. विशेष म्हणजे जलद चार्जिंगसह या फोनमध्ये 5000mAH बॅटरी आणि 50MP कॅमेरा आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F16 5G ची किंमत आणि ऑफर्स-
Also Read: 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी
Samsung Galaxy F16 5G या स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या सेलमधील ऑफर्ससह हे डिव्हाइस बंपर डिस्काउंट ऑफर आणि स्वस्त EMI सह खरेदी करता येईल. Axis बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास यात 1000 रुपयांची सूट मिळेल. हा फोन कंपनीने ब्लिंग ब्लॅक, ग्लॅम ग्रीन आणि व्हायबिंग ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
Samsung Galaxy F16 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. दमदार कामगिरीसाठी, स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. ही स्टोरेज SD कार्डच्या मदतीने वाढवता येणार आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फंक्शन देखील देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये मागील बाजूस 50MP प्रायमरी सेन्सर, 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मायक्रो लेन्स देण्यात आले आहेत. त्यासोबत फ्लॅश लाईट देखील उपलब्ध आहे. तर, सेल्फी काढण्यासाठी या फोनमध्ये13MP सेल्फी कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 7 वर आधारित वन यूआय 15 वर काम करतो. या डिवाइसला पुढील सहा वर्षांसाठी अपडेट्स मिळतील.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.