50MP कॅमेरासह Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी 

50MP कॅमेरासह Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

Samsung ने लेटेस्ट Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला.

Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपयांपासून सुरू होते.

Samsung Galaxy F16 5G फोनची विक्री 13 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने लेटेस्ट Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या किमतीत हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. तसेच, या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh जंबो बॅटरी देखील मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, Samsung Galaxy F16 5G ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: लेटेस्ट Lava फोनवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, फ्लिप नाही तरी मिळतात दोन डिस्प्ले

Samsung Galaxy F16 5G ची किंमत

Samsung Galaxy F16 5G स्मार्टफोनची किंमत 11,499 रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत सर्व ऑफर्स देखील समाविष्ट आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री उद्या म्हणजेच 13 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून खरेदी करता येईल. लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन ब्लिंग ब्लॅक, ग्लॅम ग्रीन आणि व्हायबिंग ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

samsung galaxy f16 5g

Samsung Galaxy F16 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F16 5G या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट दिला गेला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1.5TB पर्यंत वाढवता येईल.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP चा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, Glonass, Beidou, Galileo, QZSS आणि USB Type-C चार्जिंग पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo