Samsung चा 5000mAh बॅटरी असलेला Affordable फोन कायमचा स्वस्त, बघा नवीन किंमत। Tech News

HIGHLIGHTS

Samsung Galaxy A05s गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच झाला होता.

Samsung Galaxy A05s स्मार्टफोनच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

Samsung Galaxy A05s फोनच्या किमतीत 2000 रुपयांची घट

जर तुम्ही नवीन बजेट Samsung स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कदाचित हीच योग्य वेळ आहे. सॅमसंगने भारतात आपल्या परवडणाऱ्या Samsung Galaxy A05s स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy A05s गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. फोनच्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत कमी करण्यात आली आहे. बघुयात Samsung Galaxy A05s ची नवी किंमत-

Samsung Galaxy A05s ची नवी किंमत

Samsung Galaxy A05s 4GB आणि 6GB रामी व्हेरिएंटमध्ये येतो. यापैकी, 4GB आवृत्तीच्या किंमतीत 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे आणि 6GB व्हेरिएंटची किंमत 2000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कपातीनंतर Galaxy A05s चा बेस म्हणजेच 4GB व्हेरिएंट 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, दुसरीकडे फोनच्या 6GB व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये इतकी झाली आहे. हा हँडसेट लाइट ग्रीन, लाइट व्हायलेट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A05s चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A05s फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. उत्तम कार्यक्षमतेसाठी हा सॅमसंग डिव्हाइस ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, हे Android 13 ऑपरेटिंग सिस्टमसह येते. हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. या हँडसेटमध्ये सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Galaxy A05s Camera

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A05s हा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये 50MP मेन सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. तसेच, आकर्षक सेल्फी घेण्यासाठी या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास यात 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा डिव्हाईस सिंगल चार्जवर दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :