Redmiचा लोकप्रिय स्मार्टफोन Redmi 12C हा कमी किमतीत उत्तम फीचर्ससह येणारा स्मार्टफोन आहे. जर तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या फोनवर सध्या अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑफर्ससह तुम्ही हा फोन अर्ध्या किमतीत ऑर्डर करू शकता. हा बजेट श्रेणीत येणारा स्मार्टफोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे.
तुम्ही Flipkart वरून REDMI 12C चा 64GB + 4GB RAM व्हेरिएंट ऑर्डर करू शकता. लक्षात घ्या की, साईटवर या फोनची MRP 13,999 रुपये आहे इतकी आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन 50% डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या सवलतीसह हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 6,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय तुम्हाला फोनवर काही ऑफर्सदेखील मिळणार आहेत.
बँक ऑफर्समध्ये तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट व्यवहार केल्यास 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, तुम्हाला 7 हजार रुपयांची वेगळी सूट मिळण्याची देखील शक्यता आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान स्मार्टफोन एक्सचेंजसाठी उपलब्ध आहे तर, तुम्हाला फोनवर तब्बल 5,650 रुपयांची सूट मिळेल. मात्र, यासाठी तुमच्या जुना किंवा विद्यमान फोनची स्थिती उत्तम असायला हवी. येथून खरेदी करा
Redmi 12C चे मुख्य तपशील
Redmi 12C च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. उत्तम परफॉरमन्ससाठी हा फोन Helio G85 प्रोसेसरसह येतो, ज्यामुळे तुम्हाला फोन वापरताना चांगला स्पीड मिळेल. याशिवाय, फोटोग्राफीसाठी तुम्हाला फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देखील दिला जात आहे. तसेच, पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळेल, जी मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile