Samsung Galaxy S24 वर तब्बल 10,000 रुपयांची कपात
साऊथ कोरियाचे दिग्गज टेक जायंट Samsung ने अलीकडेच आपली नवीन आगामी स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 टेक विश्वात दाखल केली आहे. त्यानंतर, कंपनीने आपले लोकप्रिय जुने स्मार्टफोन्स मॉडेल्स स्वस्त केले आहेत. होय, मागील वर्षी लाँच झालेल्या Samsung Galaxy S24 फोनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आता तुम्ही हा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात, Samsung Galaxy S24 फोनची नवी किंमत-
Also Read: Best Offer! लेटेस्ट सिरीजच्या लाँचनंतर Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या किमतीत कपात, पहा डील
Samsung कंपनीने Samsung Galaxy S24 फोनची किंमत तब्बल 10,000 रुपयांनी कमी केली आहे. आतापर्यंत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये इतकी होती. मात्र, आता तुम्ही हा फोन केवळ 64,999 रुपयांना खरेदी करू शकता. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही नवी किंमत कंपनीच्या साईटवर लाईव्ह झाली आहे.
याव्यतिरिक्त, फोनच्या इतर व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 79,999 रुपये होती, जो तुम्ही 70,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, 8GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आहे, जो तुम्हाला 82,999 रुपयांना खरेदी करता येईल. परत लक्षात घ्या, नव्या किमती कंपनीच्या साईटवर लाईव्ह आहेत.
Samsung Galaxy S24 फोनमध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. एवढेच नाही तर, डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये, 50MP प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह येतो. यासोबतच, 12MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP टेलिफोटो सेन्सर या सेटअपचा भाग आहेत. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 12MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठीसाठी, हा फोन 4000mAh बॅटरीला सपोर्ट करतो, ज्यामध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.