Best Offer! लेटेस्ट सिरीजच्या लाँचनंतर Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या किमतीत कपात, पहा डील
Samsung ने नुकतेच आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 लाँच केली आहे.
नवी सिरीज लाँच झाल्यानंतर कंपनीने आपले जुने मॉडेल्स मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध
Samsung Galaxy S24 Ultra 5G वर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक जायंट Samsung ने नुकतेच आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने अनेक AI फीचर्स आणि पॉवरफुल फीचर्स ऑफर केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, नवी सिरीज लाँच झाल्यानंतर कंपनीने आपले जुने मॉडेल्स मोठ्या सवलतीसह खरेदीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Samsung Galaxy S24 Ultra 5G बद्दल माहिती देणार आहोत. सध्या या फोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. जाणून घेऊयात सवलत आणि ऑफर्स-
SurveyAlso Read: 64MP सह येणाऱ्या Realme 12 Pro+ 5G वर मिळतोय भारी Discount, ‘या’ ठिकाणी Best ऑफर्ससह उपलब्ध

Samsung Galaxy S24 Ultra 5G
Samsung Galaxy S24 Ultra 5G च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Amazon वर 1,34,999 रुपये इतकी आहे. सेलदरम्यान या फोनवर मोठ्या सवलती उपलब्ध आहेत. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy S24 Ultra 5G फोन आता Amazon वर 99,948 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तसेच, Amazon Pay द्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 2,988 रुपयांपर्यंत सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
Samsung Galaxy S24 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S24 Ultra 5G फोनमध्ये 6.8 इंच लांबीचा क्वाड HD डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच, हा फोन Android 14 वर कार्य करतो. कंपनी या फोनसोबत 8 वर्षांपर्यंतचे OS अपग्रेड प्रदान करेल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 12GB रॅमसह प्रदान करण्यात आला आहे. तर, फोन स्टोरेज सेक्शनमध्ये तुम्हाला 256GB आणि 512GB असे दोन पर्याय मिळतील.

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy S24 Ultra 5G फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा, 12MP चा तिसरा आणि 10MP चा चौथा सेन्सर देण्यात आला आहे. आकार्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये USB Type-C चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile